गोरेगाव पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका मुस्लिम महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची आधिक माहिती अशी की गोरेगाव येथील उजमा बेगम या २५ वर्षीय महीलेने आपल्या राहत्या घरी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी वाखारे, सहायक पोलिस निरीक्षक पाटील, यांनी घटनास्थळी भेट दिली असुन मुलीचे वडील शेख रफीक शेख गफुर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मयत झालेल्या महिलेस सासरच्यांनी त्रास देत घरबांधणी साठी माहेरुन विस हजार रुपयांसाठी त्रास दिला यामुळे माझ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली यामुळे पती सयद एजाज सयद कासीम, भाया सयद चाँद सयद कासीम, वहीनी तस्लीम उर्फे तशो बेगम सयद चाँद सर्व रा . गोरेगाव व नंनद हसीना परविन सरवर सिध्दीकी रा गोरेगाव या चौघां विरोधात गुरन 33 / 2022 कलम 306,498 ( अ ) 323,504,506,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला

दोघां आरोपींना आटक करण्यात आले असून मयत महिलेचे नातलग मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथे जमा झाले होते गर्दी पाहता कोनताही अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक पाटील,जमादार राहुल गोटरे,पोलीस नाईक काशिनाथ शिंदे,शंकर गायकवाड, राहुल महिन्द्रंकर,चालक भोईनर यांनी चांगल्या प्रकारे परीस्थिती हाताळल्याने कोनतिही घटना घडली नाही