वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


वाशिम : दि.१२/०९/२०२१ रोजी मालेगाव मेहकर रोडवरील मोरांडी शिवारातील एका शेतात एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत नग्न अवस्थेत मिळुन आले होते. सदर प्रेताचे डोक्यात व छातीत अग्नीशस्त्राने गोळया घालुन ठार मारल्याचे दिसुन आल्याने प्रकाश आश्रु कुटे यांचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी विरुध्द पोस्टे मालेगाव येथे अप नं.३९५/२०२१ कलम ३०२,२०१ भादवी सह कलम ३,२५ ऑर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील मयताची ओळख पटु नये याकरीता मयत इसमास विवस्त्र करुन पांगरी कुटे येथील शेतशिवारात फेकुन देण्यात आले होते. त्यावेळी सदर गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील मृतकाची ओळख पटवुन गुन्हयातील तीन आरोपी नामे १)शुभम भिमराव कान्हारकर २) विकल्प उर्फ विक्की विनोराव मोहोड ३) व्यंकेश उर्फ टोनी बिसन भगत यांना अटक करण्यात आली होती.मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह सो यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या पासुन ऊघडकीस न आलेले तसेच गंभीर गुन्हे उघड करण्यासाठी वेळोवेळी विशेष पथक नेमुन बरेच गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदर गुन्हयाील चारही आरोपी १)निशिद वासनिक वय ३४ वर्षे२) गजानन भोलेनाथ मुंगोने, वय ३३ वर्षे ३) संदेश पंजाब लांजेवार,वय २५ वर्षे ४) प्रगती निशीद वासनिक ,वय ३३ वर्षे सर्व रा.नागपुर यांना आर्थीक गुन्हे शाखा नागपुर यांनी त्यांचे कडील गुन्हयात अटक केली होती सदर गुन्हयातील आरोपी यांना मालेगाव अप नं.३९५/२०२१ कलम ३०२,२०१ भादवी सह कलम ३,२५ ऑर्म अॅक्ट मध्ये हस्तांतर करुन घेण्यात आले असुन त्यांना मा.न्यायालया समोर हजर केले असता त्यांचा मा कोर्टानी पोलीस कोठडी रिमांड दिनांक २१.०३.२०२२ रोजी पावेतो देण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास स्थागुशा मार्फत चालु आहे.सदर कारवाईत मा पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल मोहनकर पो.उप.नि पटाण,पोहेकॉ सुनिल पवार,गजानन अवगळे ,नापोकॉ प्रशांत राजगुरू,राजेश गिरी,राजेश राठोड,अमोल इंगोले,आश्विन जाधव,शुभम चौधरी संतोष शेणकुडे अविनाश वाढे पुजा पडवाळ स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *