उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम जागतिक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला हजरता सय्यदा खैरूनिस्सा रह. सरकार नानि मॉं यांचा ४७ उरूस संपन्न झालाय


ऐतिहासिक नळदुर्ग च्या किल्ल्यातील सरकार नानिमॉ यांच्या मुख्य ठिकाण यातून धार्मिक पद्धतीने संदलची मिरवणूक काढण्यात आली.
अनेक धार्मिक पद्धतीने रितीरिवाज पद्धतीने उरूस साजरा करण्यात आला. राज्यातून व परराज्यातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते नानी माँ दर्गा कमिटीचे अध्यक्ष रिझवान काझी यांनी पोलीस स्टेशन नळदुर्ग यांच्यावतीने दिलेल्या नियमानुसार हा उरूस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा आव्हान करण्यात आला .त्या पद्धतीने उरूस साजरा करण्यात आला कमिटीचे अध्यक्ष रिझवान काझी यांच्यावतीने महाप्रसादाचा वाटप भक्तांना करण्यात आला होता यावेळेस अनेक धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते यामध्ये परिसरातील धर्मगुरू गावातील प्रतिष्ठित नागरिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *