खा. प्रफुल्ल पटेल यांनी बिरसी विमानतळच तयार केले नसते तर आज प्रवासी विमान वाहतुक सुरु झाली नसती
गोंदिया : खासदार प्रफुल पटेल केन्द्र सरकार मध्ये विमानन मंत्री असतांना गोंदियाचा भविष्याचा विचार करुन बिरसी येथे असलेल्या ईंग्रजाच्या काळातील विमानतळाला नवीन स्वरुप देउन त्याला अद्यावत केले. एवढेच नाही तर दिवसा आणि रात्री ही विमाने उतरतील अशी व्यवस्था केली. त्या धावपट्टीवरुन प्रवासी विमान वाहतुक सेवा सुरु होत असल्याने जिल्हयातील जनतेने खासदार प्रफुल पटेल यांचे आभार व्यक्त केले आहेत.
देशात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व माजी केन्द्रींय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचे सरकार असतांना खासदार प्रफुल पटेल त्यांच्या मंत्री मंडळात विमान मंत्री असतांना गोंदिया येथील बिरसी येथे दुराव्यवस्थेत पडून असलेल्या विमानतळाला अत्याधुनिक विमानतळाचा दर्जा देऊन दिवसा आणि रात्री विमाने उतरण्याची सोय करुन दिली. यावेळी जिल्हयातील लोकांनी त्यांचे वर वाटेल तश्या शब्दात टिका केली. येवढेच नाही तर निवडणूक प्रचारा मध्ये अप्रचार ही करण्यात आला. पण पटेल आपल्या ध्येयापासुन मागे न हटता त्यांनी हे काम पूर्णत्वास नेले. त्याच विमान तळावर आता प्रवासी विमान वाहुतक सुरु होत आहे. यामुळे गोंदिया भंडारा जिल्हयातील नागरिकांनी खासदार प्रफुल पटेल यांनी विमानतळाची व्यवस्था केली म्हणुन आता प्रवासी विमान वाहुतक सुरु होत आहे.कदाचित पटेल यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन विमानतळाची बांधनी केली नस्ती तर आज हा दिवस पाहता आला नस्ता अशी प्रतिक्रिया गोंदीया जिल्ह्यातील सामान्य नागरिक व्यक्त करत असुन खासदार प्रफुल पटेल यांचे आभार व्यक्त केले आहे