section and everything up until
* * @package Newsup */?> गोंदिया : कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा जागर | Ntv News Marathi

गोंदिया : महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय तसेच विकास कामांची माहिती लोककलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यात सुरू झाली आहे. 17 मार्च पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची हा संदेश व सोबत योजनांची माहिती लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून दिली जात आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात बाजारपेठेच्या गावी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी लोककला आणि पथनाट्यांचा वापर प्रभावी ठरत असल्यामुळे शासनाच्या शिवभोजन थाळी, ग्रामविकास, कृषी, स्वच्छ भारत अभियान, महाआवास, आदिवासी खावटी अनुदान योजना यासह विविध योजनांची कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळात आपल्या गावांकडे जाणाऱ्या वाटसरूची तसेच ज्यांचे हातावर पोट अशा नागरिकांची भोजनाची सोय व्हावी म्हणून अत्यल्प दरात शिवभोजन थाळी शासनाने उपलब्ध करून दिली होती. या योजनेत राज्यात 7 कोटी 10 गरीब व गरजूंना लाभ देण्यात आला. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. महिला व बालविकास विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्याप्रमाणे कृषी, पणन, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, आदिवासी विकास, रोजगार हमी, आरोग्य या सारख्या अनेक विभागांनी या दोन वर्षाच्या काळात जनकल्याणासाठी योजना तयार केल्या व त्याची अंमलबजावणी केली. या योजनांची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी कलपथकांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचविली जात आहे. ही मोहीम 9 ते 17 मार्च दरम्यान राबविण्यात येत आहे. आपल्या गावात कलापथक मंडळ आल्यास या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *