छत्तीसगड ची रेती ककोडी-चिचगड मार्गाने महाराष्ट्रात..
गोंदीया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ककोडी गावाला लागुन असलेल्या छत्तीसगड बॉडर मार्गे छुप्या पद्धतीने छत्तीसगड राज्यातील रेती ककोडी-चिचगड मार्गे महाराष्ट्रात आणली जात आहे. जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याचा फायदा घेत रेती माफीया बाहेर राज्यातील रेती आनुन चढ्या भावाने विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्यावर स्थानीक प्रशासनच सहकार्य करीत असल्याचे महुसुल विभागांच्या अधिकार्यां कडुनच बोलले जात आहे.
छत्तीसगड वरुन रेती माफीया ककोडी-चीचगड मार्गे रात्रपाळीला ट्रेलर, दहाचाकी, सहाचाकी वाहना मार्फत मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत असताना निदर्शनास येत आहे. संबंधीत प्रकरन अनेक महिण्यापासुन ककोडी सिमेवरून सुरू असुन स्थानीक प्रशासन सुस्त कसा..? असा प्रश्न नागरीकानां निर्मान होत आहे. प्रशासन सुस्त असल्याचा फायदा घेत रेती माफियांनी रातोरात श्रीमंत होण्याची शक्कल लढवून व स्थानीक प्रशासनाच्या अधिकार्यांसी संगनमत करुन वाहने जाण्याकरिता जिल्ह्याच्या सिमेवर असलेला देवरी तालुक्यातील ककोडी-चीचगड मार्ग नेमला आहे. यामध्ये मोठी वाहने रात्रपाळीला जातात यासंदर्भात प्रशासनाला माहिती असून देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने प्रश्न चिन्ह निर्मान केले जात आहे. त्यामुळे रेती माफियांना प्रशासनाचे अभय असल्याचे आता जनमानसामध्ये बोलले जात आहे.
एकीकडे जिल्ह्याच्या देवरी तहसील प्रशासना मार्फत यापूर्वी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यात सव्वा लाखापर्यंतचा दंड बऱ्याच ट्रॅक्टर मालकांनी शासनाला भरून दिलेला आहे.तर अनेक ट्रक्टर देवरी तहसील कार्यालयात उभी आहेत. अश्या प्रकारे मोठा महसूल शासन दरबारी जमा करण्याचा प्रयत्न देवरी तहसीलचे तहसीलदार पवार यांच्या कडुन केल्या जात आहे. परंतु आता अप्पर तहसील कार्यालय चिचगड अंतर्गत येत असलेल्या ककोडी क्षेत्रात तशी स्थिती उरली नसल्याने तस्कर स्थानीक प्रशासनाला हाती घेत निडर होऊन सर्रासपणे रेती तस्करी करीत आहेत. रात्री बे रात्री ट्रॅक्टर, हायवा सारखे वाहने कर्कश आवाजात धुमाकूळ घालत असतात तरी देखील शासनाच्या नजरेत हे कसे येत नाही. हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
महसूल अधिकारी गप्प का?
देवरी तालुक्यातील तहसीलदार,मंडल अधिकारी, तलाठी गप्प का असा सवाल आता ककोडी-चिचगड येथिल नागरिक करीत आहे. एकीकडे जड आणि ईतर अवैध वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करायची आणि दुसरीकडे रेती भरून येणाऱ्या ट्रेलर, ट्रॅक्टर, हायवा गाड्यांना सूट द्यायची असा प्रकार राजरोसपणे ककोडी – चिचगड अप्पर तहसील कार्यालय परीसरात सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला आता उधाण येत असून तस्करांची संबंधीत विभागा सोबत आर्थिक देवाण-घेवानीचे हित संबंध तर नाही?असे बोलले जात आहे.
रात्रीस खेळ चाले…
जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात दिवसभर रेती वाहतुक बंद ठेवून रात्रपाळीला ककोडी -चिचगड मार्गे येनारी रेती तालुक्याच्या-जिल्ह्याच्या वेग-वेगळ्या ठिकाणी ट्रेलर, हायवा,ट्रॅक्टर मार्फत पुरवली जात आहे. तरी स्थानीक प्रशासन मुग गिळुन गप्प आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रेती तस्करांवर कार्यवाही करण्याची मागणी ककोडी-चिचगडच्या नागरीकांकडुन सतत होत आहे.
असी घडली होती घटना
छत्तीसगड वरुन ककोडी मार्गे ट्रेलच्या माध्यमातुन दि.२३ फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान रेतीने भरलेल्या ट्रेलर वर ककोडी क्षेत्रात कार्यवाही करन्याचा प्रयत्न दोन तलाठ्यानीं केला होता. पंरतु महसुल विभागाच्याच अधिकार्यानीं त्या रेती वाहतुक करनार्या ट्रेलरवर कोनतीही कार्यवाही न करता सोडण्याचे आदेश दिले असल्याचे त्याच तलाठ्यानीं सागींतले. त्यात संबधित तलाठीही वरिष्ट अधिकार्यांचें आदेश पाळत त्या ट्रेलर वर कोनतीही कार्यवाही न करता सोडावे लागल्याचेही त्यानीं सांगीतले आहे. जर वरिष्ट अधिकारीच रेती माफीयावर मेहरबान असेल तर कार्यवाही होनार तरी कसी व शासनाच्या खात्यात महसुल जमा होनार तरी कसा हाही प्रश्न आता निर्मान होत आहे.
मुरूम उत्खननही जोमात
तालुक्यातील वडेगाव , चिचगड, मुरदोली ,भर्रेगाव , पांलादुर/जमी परिसरात अवैध मुरूम उत्खनन जोरात सुरू आहे. विशेषता दि.३ मार्च ला तालुक्यातील वडेगाव परीसरात भर दिवसा अवैध मुरूम उत्खनन जेसीपीच्या सहाय्याने सुरू असल्याची माहीती स्थानीक तलाठी यानां ऐका तक्रार दारानी दिली असता तलाठ्यानी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत तहसीलाच काम करीत असल्याचे तक्रार दाराला सांगत हात झटकण्याचा प्रयत्न तलाठ्याने केला असल्याचे तक्रार दाराने स्वताचे नाव न सांगता सांगीतले आहे.