गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवर असलेल्या ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त असुन या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सहायक, आरोग्य सेविका व इतर असी 18 पदे रिक्त आहेत. ककोडी क्षेत्र नक्षलग्रस्त असुन आदिवासी व जगंलव्याप्त आहे. या ग्रामीण व अती दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरविण्यात यंत्रणा कर्मचार्याच्यां अभावामुळे फोल ठरीत आहे.
ककोडी हे गाव नक्षलग्रस्त, आदिवासी व जगंल व्याप्त असल्यामुळे या भागात आरोग्यसेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कायमच नाखूश असतात. त्यातूनच ही पदे रिक्त राहात असल्याने स्थानीक नागरीकानां याचा त्रास सहन करावा लागत असुन प्राथमीक उपचारा पासुन वंचित राहावे लागत आहे. ककोडी प्राथमीक आरोग्य कन्द्रांचा संपुर्ण रुग्णालयाचा भार एकाच महिला डॉक्टरावर असून, या ककोडी आरोग्य केंद्रांवर आरोग्य सेवकांची कमतरता असल्याचे अनेकदा तालुका आरोग्य अधिकारी यानां पत्रा द्वारे निदर्शनात आणुन देण्यात आले आहे. ककोडी प्राथमीक आरोग्य कन्द्रांत रुग्णांची भर पडली की, केंद्राच्या लगतच्या केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना तात्पुरती रुग्णसेवा देण्यास बोलवीले जात असल्याचे चित्र ककोडी आरोग्य केन्द्रांत पहायला मिळत आहे.
नक्षलग्रस्त ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर अनुत्सुक
लाखो रुपये वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च केलेल्या डॉक्टरांचा पदवी मिळाल्यानंतर अधिकाधिक पैसे कसे मिळतील, याकडे कल असतो. शासनाने नवीन डॉक्टरांना काही काळासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा सक्तीची केली असली, तरी अवघ्या महिना, दोन महिन्यांतच नवीन डॉक्टर न सांगता आपली सेवा समाप्त करून गायब होत असल्यामुळेच तालुक्याच्या अनेक पदे रिक्त आहेत. कोरोनामध्ये ग्रामीण जनतेला सर्वाधिक उत्तम दर्जाची आरोग्य सेवा तालुक्यातील प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरत नसल्याने. मूलभूत सुविधांच्या अभाव होत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकत नाहीत. विशेषता ककोडी प्राथमीक आरोग्य केन्द्रांवर एक महिला डॉक्टर कार्यरत असल्याने रुग्णांना सेवा देताना या डॉक्टरला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कंत्राटीपदावर आरोग्य सेवा सक्षम होणे खूप कठीण आहे, असे आरोग्य कर्मचारी संघटना आणि डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असेल तर रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
ककोडीच्या प्राथमीक आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची पदेही रिक्त असुन, ऐकुन 18 पदे ककोडी रुग्णालयात रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शासनाच्या विविध मोहीम, सर्वेक्षण नेहमी सुरू असतात. रिक्त पदे भरले तर आरोग्य क्षेत्रातील विविध मोहिमा प्रभावीपणे पार पडतील. या करिता तालुका प्रशासनाला पत्रही पाठविले आहे.
डॉ.नदनीं रामटेकर (ककोडी प्रा.आ.केन्द्रं)
ककोडी प्राथमीक आरोग्य केन्द्रांवर 18 रिक्त पदांची मागणी
आरोग्य सेविका-06, परिचर किमान-02, आरोग्य सेवक-03, आरोग्य सहाय्यीका-01, सामुदायिक आरोग्य अधिकारी किमान -03, लिपीक-01, कर्मचारी परचारीका-01, आरोग्य सहाय्यक-01.