शिबीरात एकुण ९६ रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार
सोलापूर : सुफीसंताची शिकवण अंगीकारत अकलूज शहरामध्ये संत तुकाराम महाराज बीज, राजेबागसवार बाबा रह.ऊर्स निमित्त कदम मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक तथा पत्रकार मोहसिन शेख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर उत्सपुर्त प्रतिसादात संपन्न झाले. या शिबीरात एकुण ९६ रूग्नांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक रूग्णांना तपासणीनंतर मोफत औषधे देण्यात आली.
अकलूज शहरात प्रथमच हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारा हा आरोग्य शिबीराचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या शिबिरामध्ये बीपी,शुगर ,हिमोग्लोबिन,ऑक्सिजन लेवल,आवश्यक असल्यास रक्त तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य शिबीरास रूग्नांना अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डाॅ.तानाजी कदम यांच्या उपस्थितीत नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत समाज हिताच्या या आरोग्य शिबीरास डाॅ. खतीब,डाॅ.मोरे,डाॅ. जमादार व कदम मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल स्टाप यांनी शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावली. या शिबिरातील काही रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.यामुळे राज्य शासनाचा सर्वसमावेशक जन आरोग्य कार्यक्रमाचा लाभ सामान्य जनतेला मिळण्यास मदत होणार आहे.यावेळी आरोग्य शिबीरास वेळात वेळ दिल्याबद्दल पत्रकार मोहसिन शेख यांनी सर्व डाॅक्टरांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इर्षाद सय्यद,फारूख शेख,इन्नूस बाबा सय्यद,वसिम पटेल,समीर काझी,अन्सार पठाण,अहमद शेख यांनी अथक परिश्रम घेतले .
प्रतिनिधी
मोहसिन शेख
एन.टी.व्ही.न्यूज मराठी (माळशिरस)सोलापूर
मो.७३८७५३१०७५