पी.एम रिपोर्टचा अंतिम अहवाल आलाच नाही,पोलीस तपास चालू-पो.नि समाधान कवडे
उस्मानाबाद : पाच दिवसांपूर्वी गुंजोटी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता, तर तो मृत्यू हा खून असल्याचा आरोप मयत जावेद काजी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यातील एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे व पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक समाधान कवडे करीत आहेत.
हा रहस्यमय मृत्यू होऊन 4 दिवस उलटले असून अद्याप पोलीस प्रशासन कुठल्याच निर्णयावर पोहोचले नाहीत यावर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्याशी अधिक माहिती घेण्याहेतु उमरगा पोलीस ठाणे गाठले असता श्री समाधान कवडे हे दि २३मार्च रोजी उस्मानाबाद येथे अप्पर पोलीस अधिकारी यांच्याशी काही महत्वाच्या बैठकीत असल्याचे समजले तर दिवसभर श्री समाधान कवडे हे जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याचे समजले. रात्री ९ (नऊ)च्या सुमारास पो. नी. समाधान कवडे उमरगा पोलीस ठाण्यात आले असता त्यांना तपासाबाबत व शवविच्छेदन अहवालाबाबत विचारले असता म्हणाले की,”अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही,केवळ तर्क वितर्क लावून तपास होत नसतो तर अंतिम अहवाल आल्यावर माहिती देऊ”
गुंजोटी गाव हा संवेदनशील गाव म्हणून उमरगा तालुक्यात ख्यात आहे.पण पोलीस उपविभागी अधिकारी रमेश बरकते आणि पो. नी समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्या जटिल परिस्थितीतही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत,गुंजोती गावात अगदी चोख बंदोबस्त ठेवून तपास करताना दिसून येत आहेत.
प्रेम प्रकरण
मयत जावेद काजी आणि राणी गंजेकर हे दोघे गुंजोटी गावातील एका इंग्रजी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते तर त्यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण असल्याबाबत ग्रामस्थांतुन चर्चा ऐकण्यात येत आहे.
असा झाला हाता रहस्यमय मृत्यू
शुक्रवारी रात्री, राणी गंजेकर हिने जावेद ला वारंवार फोन करून घरी बोलावून घेतले तेंव्हा जावेद हा त्याचा मित्र निजाम कागजे ला सोबत घेऊन राणी ला भेटण्यासाठी गेला होता. जावेद हा राणीला भेटण्यासाठी राणीच्या घरी गेला तेंव्हा निजाम कागजे हा शेजारच्या उद्यानात बसला पण १५ मिनिटांनी रानी आरडा-ओरडा करीत धावत निजाम कागजेकडे जाऊन म्हणाली की “तुझ्या मित्राला काहीतरी झालं आहे तो खाली पडला आहे” तेंव्हा निजामने मयताच्या भावाला बोलावून खाजगी वाहनातून खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे समजले होते.
अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट
दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॅं|वत उमरगा पोलीस ठाणे ईन्सपेक्षन करीता दि२४ मार्च रोजी आले असता गुंजोटी येथील खूण प्रकरनातील तपास,शवविच्छेदन अहवाल,शहरातील रोडरोमियोची वाढती संख्या,महाविद्यालयात, शाळेत जाणाऱ्या मुलींच्या असुरक्षितता आणि सर्वात महत्वाचे उमरगा पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक कधी लाभणार आदी विषयावर प्रश्न विचारले असता त्यांनी कमेरासमीर बोलण्यास नकार देत लवकरच प्रश्न मार्गी लावू असे बोलले व पोलीस अधीक्षक निवा जैन यांना फोन संपर्क साधून घडामोडी काळविल्या.
सचिन बिद्री:उस्मानाबाद