हिंगोली : जिल्ह्यात खुलेआम सुरु असलेले मटका,गुटखा, जुगार ,वाळुची तस्करी या अवैध धंद्या विषयी आमदार डॉ प्रज्ञा सातव यानी सभागृहात आवाज उठविल्याने अवैध धंदे चालकावर कारवाई केली जात असली तरी दुसरीकडे अनेक भागात अवैध धंदे सुरूच असल्याचे नागरीकातुन बोललं जातं आहे.

हिंगोली जिल्ह्यात खुलेआम तेजीत सुरु असलेले अवैध धंदे यामध्ये मटका, जुगार, गुटखा,अवैध वाळुची तस्करी याकडे संबंधित पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले असून यामध्ये सर्वसामान्य नागरीकांसह महिलांना फार त्रास सोसावा लागत आहे.जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी याआगोदरही भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तसेच अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिलांनी आंदोलन केले तरी पण हिंगोली जिल्ह्यात चोरी छुपके अवैध धंदे सुरु असल्याने या अवैध धंद्या विषयी आमदार डॉ प्रज्ञा सातव यांनी दि.23 मार्च रोजी सभागृहात आवाज उठविला होता

यामुळे हिंगोली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी छापामारुन मटका जुगार, अवैध दारु विक्री तसेच वसमत येथे वाळुतस्करी करणाऱ्यांवर एका टिपरवर कारवाई करुन हजारो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, उपविभागीय अधिकारी विवीकानंद वाखारे , उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत किशोर कांबळे, यांच्यासह ठाणेदार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे या पथकाने केली असली तरी आज ही जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाणे हद्दीत मटका, गुटखा विक्री, अवैध दारु विक्री,वाळु तस्करी असे धंदे सुरू असले तरी ज्या पोलीस ठाणे हद्दीत हे सर्व अवैध धंदे सुरू असले तरी स्थानिक पोलीस ठाणेदाराकडुन आपल्या हद्दीतील अवैध धंदे चालकावर कारवाई का केली जात नाही याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरीक महिलातुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *