वाशिम:अपुर्ण राहिलेले लाठी येथील कोल्हापुरी बंधार्याचे काम वारंवार निवेदन देवूनही सुरु न केल्यामुळे लाठी येथील लोकप्रतीनीधींनी वाशिम जिल्हापरिषद समोर दि.३१/३/२०२२ पासुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहे
ग्रामपंचायत लाठी पं.स.मंगरूळपीर अंतर्गत अडान नदीवर कोल्हापुरी बंधा-याचे काम सुरू असतांना दि.७/६/२०२१ रोजी पाऊस आल्यामुळे काम बंद पडले होते परंतु आज रोजी त्या बंधा-यावर जाण्या करीता रस्ता खुला आहे व नदीला पाणी सुध्दा कमी आहे.

उर्वरीत राहीलेले अपुर्ण काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे.असे संदीय पत्रानुसार सबंधित प्रशासनास कळवन्यात आले होते.तरी सदर काम विहीत मुदती पुर्ण न झाल्यामुळे झालेल्या नुकसानीस संबधीत विभाग व कंत्राटदार जबाबदार धरुन दि.३०/३/२०२२ पर्यंत काम सुरू न केल्यामुळे संबधीत कामा संदर्भात दि.३१/३/२०२२ पासुन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वाशिम यांच्या कार्यालय परिसरामध्ये उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.या ऊपोषणामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील लाठी गावचे सरपंच ,उपसरपंच व ग्रा.प.सदस्य गण यांनी जि.प.वाशिम कार्यालयासमोर उपोषास सुरुवात केली आहे.
प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206