वाशिम:आगामी ३ एप्रिल पासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र माह सुरू होत असून या महिन्यात मुस्लिम समाज बांधव संपूर्ण महिनाभर नमाज रोजा व पवित्र कुराण चे पठण करून अल्लाहची ईबादत करतात अशा पवित्र रमजान महिन्यात राज्यातील सर्व कारागृहात बंदिस्त असलेल्या मुस्लिम कैद्यांना अल्लाहची ईबादत करण्यासाठी विशेष सवलत उपलब्ध करून देणे मानवतावादी दृष्टिकोनातून आवश्यक असल्यामुळे या रमजान महिन्यात सदर कैद्यांना विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात याव्या या करिता राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर व अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनाली ठाकूर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई स्थित कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली व या मागणीचे निवेदन सादर केले.गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, येत्या ३, एप्रिल २०२२ पासून मुस्लीम धर्मीयांचे पवित्र रमजान मासची सुरवात होत आहे.

सदर महिन्यामध्ये सर्व मुस्लीम धर्माचे नागरीक (महिला / पुरुष) रोजा (उपवास) ठेऊन अल्लाह ची प्रार्थना करतात आणि यामध्ये राज्यातील कारागृहामध्ये असलेले विचाराधीन व शिक्षा भोगत असलेले कैदी सुध्दा याचे पूर्णपणे पालन करुन रोजा (उपवास) ठेऊन अल्लाह ची विशेष नमाज (प्रार्थना ) पठन करतात. यास्तव राज्यातील कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांना येत्या रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून कारागृह प्रशासना कडून सकाळी सहेरी पासून संध्याकाळी रोजा (उपवास) अफ्तारी पर्यंत आणि रात्री तराबीह च्या विशेष नमाज पठनासाठी मानवतावादी दृष्टीकोनातूनआवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम