३१ मार्च २०२२ अखेरीस एकुण नफा १ कोटी १लाख

लातुर : भाऊसाहेब सहकारी बँक लि.उदगीर यांचे संस्थापक कै.रामचंद्रराव विठ्ठलराव पाटील तळेगावकर यांनी बँकेची १९९६ साली उदगीर येथे पहिली बँकेची शाखा सुरुवात केली.आज २७ वर्षात याच बँकेच्या सहा शाखा तयार झाल्या आहेत.तसेच अध्यक्ष भगवानराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर,देवणी,वलांडी,चाकुर,निलंगा,हंडरगुळी या सहा शाखेतील सर्व व्यवहार सर्व बँकेतील स्टाँप च्या सहकार्यामुळे आज सर्व शाखा प्रगतीपथावर आहेत.


३१ मार्च २०२२ अखेर माहितीची सद्य स्थिती एकुण नफा १ कोटी १ लाख आहे.२७ वर्षांमधील ही पहिलीच वेळ व याचे श्रेय मुख्यधिकारी एल.एम.कुलकर्णी,सरव्यवस्थापक व्यंकट रामराव पाटील यांच्या अथक परिश्रम, वेळोवेळी मार्गदर्शन, प्रत्येक शाखा प्रमुख यांच्याशी संपर्क बैठका,अशा विविध कामाची तत्परता दाखवल्यामुळे हे लक्ष बॅंकेला गाठता आले. तसेच भाऊसाहेब सहकारी बँक लि.उदगीर ज्युनिअर ऑफिसर शिवाजी भगवानराव पाटील यांचे विविध शाखांमध्ये लक्ष ग्राहकांच्या सोयीसाठी काय करावे,हा सतत विचार, प्रगती ही सर्व शाखेतील पदाधिकारी व इतर कर्मचारी यांच्या कामाची तत्परता म्हणजे बॅंकेची यशस्वीतेसाठी वाटचाल होय. तसेच मुख्य लेखापाल शिवाजी संग्राम पाटील वार्षिक हिशोब तपासणीमध्ये वेळोवेळी लक्ष देऊन त्यामध्ये त्यावरील चर्चा करून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य काम करत गेले या कामाचे योगदान मोलाचे ठरले.

सर्व शाखांमध्ये जमा खातेदार, चालु खातेदार,पिग्मी ठेवखातेदार, खातेदार यांची संख्या भरपुर आहे. भाऊसाहेब सहकारी बँक लि.उदगीर अंतर्गत सर्व शाखांमधील ४५कर्मचारी व एकुण बॅंकेतील ठेवी ७३ कोठी ९० लाख, एकुण कर्ज वाटप ५० कोठी,ग्रास नफा १ कोठी ३२ लाख ३० हजार, निव्वळ नफा १ कोठी १लाख ३०हजार,सी.आर.ए.आर.१५.३०%, तसेच ग्रास एन.पी.ए.२ कोठी ३० लाख ४९ हजार ४.६०% व निव्वळ एन.पी.ए.३९ लाख ३० हजार ०.८२% अशा प्रकारे बॅंकेच्या व्यवहारात भाऊसाहेब सहकारी बँक लि.उदगीर च्या सर्व शाखा अग्रेसर ठरल्या आहेत.भाऊसाहेब सहकारी बँक लि.यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकास्पद काम म्हणून कौतुक केले जात आहे.

लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर

            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *