सोलापूर : मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माळशिरस शहराध्यक्षपदी अजीमभाई मुलाणी यांची आज समितीच्या माळशिरस कार्यालयात निवड करण्यात आली .यावेळी ऐडवोकेट दादासाहेब पांढरे-पाटील,संस्थापक अध्यक्ष आमिरभाई शेख, प्रदेश अध्यक्ष रशिद भाई शेख यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देत सत्कार करण्यात आला.

आगामी काळात मुस्लिम समाजातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात जोमाने कार्य करणार असल्याचे यावेळी अजीम मुलाणी यांनी आपले मत व्यक्त केले.मुस्लिम समाजा हा आर्थिक सक्षम व उच्चशिक्षित पदवीधर होणे अपेक्षित आहे यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल असे प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख म्हणाले.या निवडीवेळी शाहबाज शेख, मुबारक तांबोळी, मोसिन इनामदार आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी,
मोहसिन शेख
एन.टी.व्ही.न्यूज मराठी माळशिरस (सोलापूर)
मो.७३८७५३१०७५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *