
लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानी केक कापून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा
लातूर : राज्याचे काँग्रेस नेते मराठवाड्यातील बहुआयामी विकासपुरुष व्यक्तिमत्त्व असलेले जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात एक आपली वेगळी ओळख असलेल्या राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या उपस्थितीत आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी बँकेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, माजी चेअरमन तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अशोकराव गोविंदपुरकर, संचालक व्यंकटराव बिरादार, जयेश माने, अँड राजकुमार पाटील, मारोती पांडे अनुप शेळके, लक्ष्मीबाई भोसले सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, बँकेचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, बंडू किसवे, प्रभाकर केंद्रे, उपस्थित होते.
काका– पुतणे यांनी एकमेकांना केक खाऊ घालतात तेव्हा

काका पुतणे अतूट नाते वेगळा लातूर पॅटर्न
आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने एक दिवस अगोदर बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी काका – पुतण्यानी वाढदिवसा निमित्ताने केक कापल्यावर काका दिलीपराव देशमुख यांनी पुतणे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना जवळ घेवून तितक्याच प्रेमाने केक खाऊ घातला. यावेळी काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब पुतणे आमदार धीरज देशमुख यांच्या अतूट नात्याचे भाव प्रतिबिंब उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्यूज मराठी लातूर
9850347529