उस्मानाबाद – (सचिन बिद्री:उमरगा)
तालुक्यातील नाईचाकूरचे सुपुत्र व उपविभागीय कार्यालय उमरगा येथील कर्मचारी श्री एजाज पटेल हे प्रतिवर्षी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, मागील दोन वर्ष कोरोना या महामारीत श्री पटेल यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या चे औचित्य साधून नाईचाकूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी आशा कार्यकर्त्या रास्त धान्य दुकानातील कामगार कोरोना दक्षता कमिटी, नाईचाकूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे व किट ,मास्कचे वाटप केले होते १ मे २०२१रोजी वाढदिवसाचा खर्च टाळून एजाज पटेल यांनी उमरगा येथील ईदगाह कोवीड सेंटरला ५०० अंडी व टरबूज भेट दिले होते कोविड केंद्रातील रुग्णांना सकल आहार मिळावा या उदात्त हेतूने मदत केले होते.

१मे२०२२ रोजी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करीत एकुरगा येथील तुळजाभवानी अनाथ मतिमंद आश्रम शाळेतील मुलांना फळे व अंडी देऊन आपला वाढदिवस साजरा केले.आमदार ज्ञानराज चौगुले,उपविभागीय अधिकारी गणेश पवार आणि एस डी एम कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग आदींनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.