उस्मानाबाद – (सचिन बिद्री : उमरगा)

उमरगा येथे ईदगाह मैदानावर नमाज पडण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि .३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यत आल्या.
उमरगा येथे ईद निमीत्त प्रत्येक वर्षी ईदगाह मैदानावर नमाज पठण केली जाते . त्यासाठी शहरातीत किमान पाच हजार मुस्लीम बांधव नमाज पढण्यासाठी एकत्रीत येतात . मागील दहा ते पंधरा वर्षापासुन उमरगा शहरात या बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुलाब पुष्प किंवा फुले देवुन शुभेच्छा देन्याची परंपरा चालु आहे. सर्वधर्मसमभावाचा उत्तम संदेश या माध्यमातुन दिला जातो. जातीय सलोखा , समता , व शांतता नांदन्यासाठी चांगला संदेश जिल्हावासीयांना मीळवा यासाठी हा उपक्रम राबवीला जातो .


या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्यासह,तालुकाध्यक्ष संजय पवार डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ .यतीराज बिराजदार, सरचिटणीस धीरज बेळंबकर, नगरसेवक बालाजी पाटील, खाजा मुजावर ,शहराध्यक्ष सुशील दळगडे, शिवाजी पवार, विष्णू भगत ,वाघंबर सरवदे , विजय सगर ,अजित पाटील , फैय्याज पठाण ,किसन कांबळे , श्री.उपासे आदी पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठया संखने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *