सोलापूर : अकलूज नगरपरिषदचे तडफदार,कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी धैर्यशील जाधवराव यांची पदोन्नती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त या पदावर झाली.नव्याने 3 ऑगस्ट 2021 रोजी 43 दिवस उपोषण करून, न्यायालयीन लढाई करून निर्माण झालेल्या अकलूज नगरपरिषद चे प्रथम प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून धैर्यशील जाधव यांनी सूत्रे आपल्या हातात घेऊन अकलूज नगरपरिषद कर्मचारी, नागरिक यांना आपल्या विश्वासात घेऊन अकलूज परिसर स्वच्छ सुंदर हरित व प्रदूषणमुक्त करण्यासाठी संकल्प करून स्वतः कचरा डेपोट उतरून प्लास्टिक पिशवी बंदी करून दर शनिवारी अकलूज नगरपरिषद च्या विविध भागांमध्ये जनजागृतीपर सायकल फेरी,स्वच्छता मोहिम राबवून अकलूज शहरातील नागरिकांना स्वच्छतेची आवड निर्माण केली.

घरोघरी निर्माण होणारा कचरा घरगुती स्त्रियांना दूर जाऊन टाकायला त्रास होत होता त्यासाठी कंत्राट पध्दतीने 18 घंटागाड्या घेतल्या,अकलूज नगरपरिषद हद्दीत रोगराई पसरू नये यासाठी नवीन 10 फोगिंग मशीन व 10 औषध फवारणी मशीन घेण्यात आल्या. मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासाठी 10 हजार वृक्षा रोपण संकल्प केला त्याला अनुसरून अकलूज नगरपरिषद स्वतःची रोपवाटिका,वृक्ष पतपेढी तयार केली.मिळालेल्या संधीचा व वेळेचा सदुपयोग करून अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना भरपूर सोयी सुविधा पुरविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी केला. आज रोजी अकलूज नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी धैर्यशील जाधवराव यांनी पदोन्नतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर बढतीचा आदेश अकलूज नगरपरिषदेस प्राप्त झाला.

प्रतिनिधी
मोहसिन शेख
एन.टी.व्ही.न्यूज माळशिरस (सोलापूर)
मो.७३८७५३१०७५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *