पुणे : बारामती तालुक्यात तांदुळवाडी येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा सुनावली.

याबाबत मिळालेल्या माहितीवरून सदर घटना दिनांक 15 जून 2018 रोजी घडली होती पोलिसांकडे या गुन्ह्याची नोंद आहे. यातील पीडित महिला ही घरात एकटे असताना तिचा विनयभंग केला होता. तुला उचलून नेईल तसेच नवऱ्याला मारून टाकेन अशा स्वरूपाची ही फिर्याद दाखल होती.बारामती शहर पोलीस ठाण्यात यासंबंधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारी पक्षातर्फे एडवोकेट राहुल सोनवणे यांनी युक्तिवाद केला. हा ग्राह्य धरत संबंधित आरोपीस एक वर्ष सश्रम करावास व 6000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी- पल्लवी चांदगुडे (बारामती)