प्रभाग क्र. 3 मधील विजयभाऊ कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण व गटर बांधकाम या कामाचे उद्घाटन मा.ना. जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते व मा. मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना मा.ना. जयंतरावजी पाटील साहेब म्हणाले की, विजयभाऊ कॉलनीमधील जागेच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठवणे कामी मा. मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा म्हणजे तेथील स्थानिक रहिवाशी यांना दिलासा देण्याचे काम लवकर करता येईल. तसेच याप्रसंगी मा.ना. जयंतरावजी पाटील साहेब यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन नागरिकांच्या कुटूंबियांची व जेष्ठा व्यक्तिंची वैयक्तिक पातळीवर विचारपूरस केली.
सदर काम बुथ अध्यक्ष श्री. राहूल नागे यांच्या प्रयत्नातून प्रस्ताव सादर करण्यापासून ते नगरपरिषदेचा ना हरकत दाखल मिळण्यासाठी राहुल नागे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी शहाजी पाटील, दादा पाटील, विश्वनाथ डांगे, खंडेराव जाधव, बाबासाहेब सुर्यवंशी, संदीप पाटील, सुभाष सुर्यवंशी, संग्राम पाटील, हणमंत माळी, शंकर चव्हाण, आयुब हवालदार, विलास भिंगार्डे, संभाजी कुशिरे, वसंत पाटील, गोपाल नागे, बंडा माने, अमरसिंग पाटील, राजाराम माळी, अनिल पावणे, सुर्याजी पाटील, अरूण कदम, अर्जुन सुतार, सुरेश शहा, कृष्णात माळी, दत्ता गवळी, नागेश होगार, संजय वाठारकर, रवि वाघमोडे, संदेश माळी, सतिश जाधव, सुशांत जाधव, हर्षद पाटील, मोहन भिंगार्डे, प्रांजल वाठारकर, सोन्या देसाई, रोझा किणीकर, कमल पाटील, मालन वाकळे, शैलेजा जाधव, प्रतिभा पाटील, योगिता माळी, प्रियांका साळुंखे तसेच येथील रहिवाशी याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल वाडकर
