दिनांक 5 जूनपासून महेशोत्सव
यवतमाळ : भगवान महेश या ईश्वराचे वंश म्हणजे माहेश्वरी. या समाजाचा वांशोत्पती दिवस महेश नवमी 8/6/2022 रोजी आहे उमरखेड माहेश्वरी संघटन /महिला संघटन व युवा संघटन यांचे तर्फे महेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन 5 जून ते 9 जून पर्यंत करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 5 जून रोजी सकाळी 9.30 वाजता अलका श्री गोपाल भट्टड अध्यक्ष यवतमाळ जिल्हा माहेश्वरी महिला संघटन यांच्या शुभहस्ते होणार आहे .याच दिवशी महारक्तदान शिबीर ,चेस व कॅरम स्पर्धा , 18 वर्षाखालील वयोगटासाठी मारवाडी संस्कृती आमची विरासत व 18 वर्षावरील वयोगटासाठी बेटी ब्याहो.. बहु पढाओ..( अर्थ उच्च शिक्षणासाठी मुलीचे लग्न उशिरा न करता येणाऱ्या सुनेला उच्चशिक्षण द्या) त्यामुळे समाजातील अनेक अडचणी दूर होतील या दोन विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे .याच दिवशी लहान मुलांच्या संगोपनासाठी टॉक शो समाजातील सर्व आई+वडिलांची खुली चर्चा होणार आहे यासाठी मुख्य अतिथी महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेविका व प्रखर वक्त्या सौ.नीना संजय भंडारी पुसद या येणार आहेत. त्यानंतर राजस्थानी चोख ढानी आनंद मेळावा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये स्वतः तयार केलेले खाद्य पदार्थचे विवीध स्टॉल लावण्यात येणार आहे. सोमवार 6 जून रोजी बॅडमिंटन व स्विमिंग स्पर्धा तसेच 6 जून ते 8 जून रोजी लहान मुलांसाठी बाल संस्कार शिबिरआयोजित करण्यात आले आहे.

मंगळवार सात जून रोजी लॉन टेनिस स्पर्धा व निर्विघ्न हॉस्पिटल उमरखेड येथे हृदयरोग व मधुमेह या आजारासाठी निशुल्क रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये उमरखेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत भट्टड व डॉक्टर स्नेहा भ्ट्टड आपल्या सेवा विनामूल्य देतील. बुधवार 8 जून रोजी सकाळी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी एक एक कुटुंबाला लेखी देण्यात येणार आहे. त्यानंतर महादेवाचा अभिषेक व सायंकाळी चार वाजता भव्य शोभायात्रा व त्यानंतर मुख्य कार्यक्रम व पुरस्कार वितरण होणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आमदार श्री नामदेवरावजी ससाने मुख्य अतिथी श्री नितीनजी भुतडा जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ व श्री नंदकिशोरजी अग्रवाल राहणार आहेत. राजस्थानी समाजातील ज्येष्ठ मंडळीच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे .ज्या मुली किंवा सून यांनी परिवाराच्या सेवेसाठी स्वतःच्या नोकरीचा त्याग केला आहे त्यांना कुटुंब कल्याणी तर पंचावन्न वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला ज्यांनी तीन मुलीना जन्म दिला आहे त्याना समाज कल्याणी या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .या कार्यक्रमानंतर महिला मंडळातर्फे देवो के देव महादेव हा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न होईल . शेवटी आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल . उतना ही लो थाली मे …व्यर्थ न जाये नाली मे .. अन्नाचा एक कण सुद्धा वया घालणार नाही या संकल्पाने भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. माहेश्वरी संगठन अध्यक्ष श्री विजय भुतडा सचिव आनंद तेला महिला संघटन अध्यक्ष राधिका भट्टड सचिव उमा भट्टड युवा संघटन अध्यक्ष अभिषेक भंडारी सचिव आयुष बाहेती व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संदीप भट्टड महासभा सदस्य राजकुमार भंडारी जील्हा उपाध्यक्ष गोविंद सोमाणी मारवाडी युवा मंच अध्यक्ष संतोष बंग यांनी सर्व स्पर्धा व सर्व कार्यक्रमासाठी संपूर्ण राजस्थानी समाजाला बाहेरगावाहून आलेल्या मुली बहिणी सोबत सहपरिवार येण्यासाठी विनंती केली आहे.