यवतमाळ : सामजिक संघटनेत काम करत असताना समाजकार्याला कुठेतरी राजकारणाची जोड देत त्यानी गेल्या वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपल्या कार्य कौशल्य व संघटन कौशल्यच्या जोरावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपद मिळविले,वेळोवेळी शेतकरी, अपंग, विद्यार्थि,कामगार,रस्त्याने, सर्व सामान्य माणसाचे प्रश्न आपल्या शांत स्वभावाने व तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लावून धरले. देवतुल्य स्व.मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांच्या विचाराने प्रभावीत झालेला हा तरुन आज पुसद कार्यसम्राट आमदार श्री.इंद्रनिल भाऊ मनोहरराव नाईक यांच्या तालमीत तयार होतो आहे मग शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडीत झाला त्या बद्दल असो, ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावा, रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलन, अपंग निधी प्राप्त करून देण्यासाठी आंदोलन असो,निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातुन जवळपास पंधराशे मायमाऊलीना लाभ मिळवून देणारे व आणखीन लाभार्थ्यांना सदैव मदत करणारे, विविध स्पर्धा आयोजित केल्या,रक्ताची गरज असो, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली.कोरोना काळात गरजूंना धान्य वाटप,घरकुल योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड ,अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत.

तसेच विद्यार्थ्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू असते, विशेष शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. यश–अपयश पदरी पडत गेले या प्रामाणिक हेतूने समाजहिताचे कार्य सूरू आहे शिवाय बबलु भाऊचे शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे व त्यांचे ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे,अस बोलले जात आहे. सध्याचं राजकीय वातावरण बघता या तरुण चेहऱ्याला कितपत पसंदी मिळतंय हे बघणे अधिक सार्थ ठरणार आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता त्यांच्याकडे एक युवा,निष्कलंक व तडफदार नेतृत्व म्हणुन बघितले जात आहे.बबलू भाऊ ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे.आज रोजी बबलु भाऊ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहे, त्याच्या कामाच्या जोरावर त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेडचे तालुकाध्यक्ष पद देण्यात आले आहे,
दिग्गज नेत्यांच्या विरोधात एक तरुण असे चित्र या भागात तयार झाले आहे.

अनेक वर्षापासून या बंदीभागाचा रखडलेला विकास करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला अस ते सांगतात, या भागातील प्रश्नांना घेऊन बबलु भाऊनी अनेक आंदोलन केलंय, एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी धडपड करत असतो.लोकांनी साथ दिली तर नक्कीच या भागाचा कायापालट होणार असे बबलु भाऊ नेहमी सांगत असतात.ज्यांनी कधी एक केलें नाही कधी लोकांचे प्रश्न सोडविले नाही फक्तं पैश्याच्या जोरावर निवडणुकीत उतरणार आहे. त्यांना भाऊच्या उमेदवारी मुळे जबर धक्का बसला आहे.अतिशय कमी काळातच बबलु भाऊने ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे….जिल्हा परिषद निवडणुकीत बबलु भाऊचे नाव चर्चेचा विषय ठरला आहे.अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर सर्व सामान्य,गोरगरीब माणसांची बबलु भाऊ ने ही निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *