माजी जि. प. उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांची पत्र परिषदेत माहिती
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजोपयोगी कार्यात सदैव तत्पर राहिला असून यापुढे शहर व ग्रामिण भागात पक्षसंघटन अधिक मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल राहु असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी जि . प . उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी केले . ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिना निमित्त कार्यकर्त्यांसोबत पक्ष वाढीबाबत स्थानिक जिजाऊ भवन येथे आयोजित चर्चासत्र आटोपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या वर्धापन दिना निमित्त त्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात 22 वर्षाच्या कार्यकाळात पक्षाने अनेक समाजोपयोगी कार्य करून सर्व सामान्य जनतेच्या उत्थानासाठी विकासात्मक ध्येय्य धोरणांची अंमल बजावणी करीत विविध योजना राबविल्या . कोरोना महामारीच्या काळातही पक्ष कार्यकर्त्यांनी नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी गावोगावी उपक्रम राबविले होते . राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सोबत सत्तेत आहे . हे सरकार पाडण्यासाठी फालतू विषय समोर करून केन्द्र सरकारची अनेक कुटील कारस्थाने सुरु आहेत . परंतु महाविकास आघाडीचे सरकार या कारस्थानांना सडेतोड उत्तरे देत आहे . केन्द्र सरकारने राज्याचा अद्याप जीएसटी परतावा दिलेला नाही , कापूस सोयाबिनला हमीभाव नाही, जिवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडलेतसेच खतांचे भाव वाढवून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटण्याचे काम करीत असल्याचा आरोपही यावेळी कामारकर यांनी केला . आगामी जि . प व नगर पालीका निवडणूकीमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी निवडणूकी संदर्भात पक्षाची ध्येय्य धोरणे आखली जाणार असून यावेळी जिल्ह्यासाठी पक्षाला संपर्क मंत्री मिळाला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन जिल्ह्यातील 8 पैकी 5 नगर पालीका जिंकून आणू तसेच जि . प . मध्येही पक्षाच्या जागा वाढविणार असा विश्वास कामारकर यांनी व्यक्त केला . पक्ष स्वबळावर जागा लढवेल अशी आजची परिस्थिती असली तरी शेवटी पक्षादेशाप्रमाणे काम करणार असल्याचे ते म्हणाले . त्याच बरोबर पक्षात महिला संघटण वाढविणे , उमरखेड येथील जि . प . च्या मालकीची चुरमुरा रोडवरील अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील अतिकमण हटविणे , बंद पडलेला वसंत कारखाना सुरु करणे याबाबत प्रयत्न राहणार असल्याचेही शेवटी त्यांनी सांगीतले . यावेळी ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव पंडागळे जिल्हा सरचिटणीस दत्ताजी गंगासागर कल्याणराव माने विधानसभा अध्यक्ष भिमराव पाटील चंद्रवंशी , श्रीराम पाटील नलावडे , तालुका अध्यक्ष शंकर तालंगकर , मिथीलेश जयस्वाल संभाराव कदम, बीबीचंद राठोड , शहरध्यक्ष युसुफ सौदागर , गुणवंत सुर्यवंशी , झाकीर राज यांच्या सह असंख्य पदाधिकारी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते .