गोंदिया : सध्या हंगामी शेतपीकांच्या कामाला जिल्ह्यात सुरवात झालेली आहे. जास्त प्रमानात शेतीची कामे ट्र्क्टरच्याच सहाय्याने शेतकरी करतात त्यामुळे सायकांळी शेतीचे कामे संपवुन शेतकरी जेव्हां चिखलाने माखलेला ट्रक्टर बाहेर काढतो व तो ट्रक्टर संपुर्ण रस्ता खराब करतो ज्या मुळे अनेकांचे अपघात होन्याची भीती असते त्यावर तोडगा म्हनुन गोंदीया जिल्ह्याच्या देवरीचे तहसीलदार यानीं माखलेल्या रस्त्यावर, कोणतेही वाहन घसरून वाहन चालकाचा जीव जाऊ शकतो. रस्ते हे सुखकर प्रवासासाठी असतात. त्यामुळे रस्त्यावर चिखलाने माखलेले ट्रॅक्टर आणता कामा नये; अन्यथा अशा ट्रॅक्टर चालक- मालकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद देवरीचे तहसीलदार अनिल पवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवकांना आपल्या हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना सूचना देण्याविषयीचे लेखी आदेश तहसीलदार देवरी यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत. पावसाळ्याच्या तसेच रब्बी हंगामात ट्रॅक्टर चालक हे शेतात चिखलणी करून चिखलाने माखलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात. त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेला चिखल हा रस्त्यावर येतो. बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माखलेला असतो. परिणामी, रस्ता निसरडा होऊन अनेक वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. ट्रॅक्टर चालकाच्या अशा चुकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्व ट्रॅक्टरचालकांनी शेतात चिखलणी केल्यानंतर आपले वाहन पाण्याने धुतल्यानंतरच मुख्य मार्गावर आणावे; अन्यथा संबंधित वाहन चालक-मालक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार अनिल पवार यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी आणि ग्रामसेवक यांना यासंबंधी कारवाई करण्याचा लेखी आदेश नुकताच देण्यात आला आहे.