त्या दोन्ही शिक्षकांवर उपास मारिची वेळ …
गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव येथे अनेक वर्षापासुन कार्यरत असलेल्या दोन शिक्षकानां मुख्याध्यापकाने कोनतेही अग्रीम नोटीस न देता त्यानां कार्यमुक्त करीत देवरी येथिल प्रकल्प कार्यालयात रूजु होन्यास सांगीतले आहे. पंरतु आठवडा लोटुनही प्रकल्प कार्यालयाने त्या दोन्ही शिक्षकानां रुजु करुन घेतले नसल्याने त्या शिक्षंकावर उपासमारीची वेळ आली असुन मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्त व्रुत्त असे की, दिनांक- 30 जुन 2022 ला शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव येथे मागील पाच वर्षापासुन कार्यरत असलेले के.एस.खांडेवाहे माध्य. शिक्षक, व एस. आर. डेंगळे प्राथ. शिक्षक यानां आश्रम शाळेतील मुख्याध्यापकाने प्रवेशोत्सव तयारी मधे हलगर्जीपणामुळे कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र देत तात्काळ कार्यमुक्त केले. व प्रकल्प कार्यालयात रुजु होन्यास सांगीतले पंरतु प्रकल्प कार्यालयात रुजु होन्यास दोन्ही शिक्षक गेले असता त्यानां प्रकल्प कार्यलयातही रुजू करन्यात आले नाही उलट आपन ए.टी.सी. नागपुर कार्यालयात दादा मागावी म्हनत प्रकल्प कार्यालयाने हात झटकनी केली.
विशेषता आश्रमशाळेतील मुख्याध्यापकानें दोन्ही शिक्षकांवर आरोप करत प्रवेशोत्सव करीता विद्यार्थी शाळेवर आणण्याकरिता कोणताही प्रयत्न केलेला नाही, आपण प्रवेशोत्सव करीता प्रत्येकी केवळ 1 विद्यार्थी उपस्थित केला, आपले मागील 2 दिवसापासून मी निरीक्षण करीत होतो. आपण विद्यार्थी उपस्थित करण्याकरिता कोणताही प्रयत्न केले नाही, शिवाय शाळेच्या कार्यालयीन ग्रुपवर गावभेट दिल्याचेही दिसले नाही, यावरून आपण आदिवासी विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासाविषयी गंभीर नाही, प्रवेशोत्सव तयारीकरीता दिलेली जबाबदारी सुद्धा पार पहलेली नाही , आपण कायम गेटवर बसलेले असल्याचे खोटे कारने सांगत दोन्ही शिक्षकानां मुख्याध्यापकाने आस्थापनेवरून कार्यमुक्त केले व त्या दोन्ही शिक्षकामुळे शाळेचे वातावरण दूषीत होत असल्याचे खोटे आरोप करत प्रकल्प कार्यालयात पाठविण्यात येत असल्याचे पत्र त्यानां दि.30/06/2022 ला कार्यमुक्त करतो असे आदेश दिले व दोन्ही शिक्षकानीं प्रकल्प कार्यालयात तात्काळ रुजू व्हावे असे आदेश दिले. पंरतु प्रकल्प कार्यालयही बेकायदेशीर पणे त्या दोन्ही शिक्षकांवर अन्याय करत चित्र असल्याने तालुक्यातील शिक्षकात वरीष्ट अधिकांर्या विरोधात आक्रोसाची भावना निर्मान होत आहे.
प्रतिक्रीया
माझी काहीच चुक नसुनही खोटे आरो मुख्याध्यापकानीं माझ्यावर केले आहे. सतत आपन शनिवार रविवार गैर हजर राहत असुन माझ्यावर खोटे आरोप करत आस्थापने वरुन कार्यमुक्त केले व प्रकल्प कार्यालयात रुजू होण्यास सांगीतले पंरतु प्रकल्प कार्यालयानेही समाविष्ट न करता अप्पर आयुक्त कार्यालय नागपुरला जान्यास सांगीतले आहे. – एस.आर.ढेंगळे (प्राथ.शिक्षक)
प्रतिक्रीया
मागील अनेक वर्षापासुन शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक कन्या श्रमशाळा बोरगाव या ठिकानी माध्यमीक शिक्षक म्हनुन मी कार्यरत आहो. अनेक दा मुख्याध्यापक मला व ढेंगळे सर यानां मानसीक त्रास देन्याच्या उद्देशाने हे करीत असतो. ३० जुन २०२२ ला कार्यमुक्त केलेल्या कार्यवाहीत कोनतेही कारन नसतानां कोनतेही कारने दाखवा पत्र न देता सरळ आश्रम शाळेतील आस्थापने वरुन कार्यमुक्त करत प्रकल्प कार्यालयात हजर होन्यास सांगीतले. पंरतु प्रकल्प कार्यालयानेही आम्हाला सामावुन न घेता , कोनतेही कार्यालयीन पत्र न देता अप्पर आयुकत कार्यालय नागपुर येथे जान्याचा सल्हा दिला.-के. एस. खांडवाहे (माध्य. शिक्षक)
प्रतिक्रीया
दोन्ही शिक्षकांच्या येत असलेल्या सततच्या तक्रारीमुळे त्यानां बोरगाव आश्रम शाळेतुन कार्यमुक्त करत प्रकल्प कार्यालात पाठविन्यात आले आहे.– भाकरे (मुख्याध्यापक आश्रम शाळा बोरगाव)