आमगाव आदर्श – मराबजोब गावाला जोडनारा पूल दुसर्यांदा पुराच्या पाण्याखाली…
जनप्रतिनीधिंचे निवडनुकीतील आस्वासन मतदाना पुर्तीच का….?
गोंदीया : पावसाळा सुरू आहे. पाऊस धोधो कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यात पुर परिस्थीती निर्मान झाली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीन भागातील नाले भरभरुन वाहु लागले आहे. त्यातच जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील देवरी शहरापासुन सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव आदर्श व मराबजोबला जोडनार्या पुलाला पूर आल्याने या गावांचा देवरी शहराशी संपर्क काही काळ तुटला आहे. विशेष म्हणजे हलक्या पावसातही हा पूल सतत पाण्याखाली जात आहे. शुक्रवारला हा पूल जवळपास पाच तास पाण्याखाली होता.यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विशेषता ज्या जनप्रिनीधींना या जिल्हापरिषद क्षेत्रातील नागरीकानीं निवडुन दिला त्या जनप्रतिनीधिंचे निवडनुकीतील आस्वासन मतदाना पुर्तीच होते का ? असा प्रश्न आता नागरीक करीत आहेत.
विशेषता काही महिन्या अगदोरच जिल्हापरिषद-पंचायत समीतीच्या निवनुका झाल्यात. निवडनुकीत उभे असलेल्या जनप्रतिनीधी मोठ – मोठे आस्वासनही मतदारानां दीले. पंरतु जिकुंन आल्यानंतर त्या जनप्रतिनींधिना आपल्या मतदार क्षेत्रातील सामान्य जन्तेच्या समस्येचा विषर झाल्याचे नागरीकात चर्चा आहे. आमगाव आदर्श व मरामजोब ह्या दोन्ही गावातील अनेक नागरीकानां रोजच रोजगारा करीत शहरात याना लागतो. परंतु या शहराला जोडनारा पुल सतत पाण्यात वाहुन जात असल्याने नागरीकांना अनेक समस्यानां तोडं द्यावे लागते तर जिव मुठीत ठेऊन त्या नाल्याच पुल पार करावा लागतो. दोन आठवड्या अगोदर ह्या पुलावरुन पुर गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क शहरासी तुटला होता. दुसर्यांदा शुक्रवारी हलक्याच पाण्याने पुन्हा पुर परिस्थीती निर्मान झाली व दोन्ही गावातील नागरीकांचा शहरासी संपर्क तुटला होता.
तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तालुक्याच्या ग्रामीन भागातील नदी नाल्यानां पूर आला आहे. आमगाव आदर्श – मराबजोब गावानजीकच्या नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी काल दुपारी बंद होता. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले आहेत.हा पूल पाण्याखाली गेल्याने या गावातील लोकांना पर्यायी मार्ग शहरात येन्या – जान्याचा नसल्याने गावातच रहावा लागत आहे. विशेष म्हणजे स्थानीक जनप्रतिनीधी याकडे लक्ष देत नसल्याचे या दोन्ही गावातील नागरीकांचे म्हनने आहे. शहरातील नागरीक गावात व गावातील नागरीक घरी जाण्यासाठी पुलावरील पाणी बसण्याची वाट पहात बसून असतात तर स्थानीक जनप्रतिनीधिनां निवडनुकी वेळी दिलेल्या शब्दांचा विषर पडल्याचा नागरीकात चांगलीच चर्चा रगंली आहे.