दयानंद महाविद्यालय लातूर टी सी देत नसल्याचा पालकांचा आरोप
उस्मानाबाद : आदिवासी भिल्ल समाजातील एस.टी या प्रवर्गात शिष्यव्रती धारक विद्यार्थी हा लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ११ वी आणि १२ वी शिकला पण आता पुढील शिक्षणासाठी टी सी ची मागणी केल्यास साठ(६०) हजार रुपयांची मागणी होत आहे जे की माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे अनुदानित वर्गातून प्रवेश दिला तरी एवढी रक्कम आता का मागणी होत आहे, दोन वर्षात कसेबसे करून वीस हजार रुपये फिस भरलोय तेही मला परत देण्यात यावे अशी मागणीपर निवेदन,विद्यार्थी शिवराज विभूते यांचे वडील संजीव रामलु विभूते,रा उमरगा जि उस्मानाबाद, यांनी मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिवराज संजीव विभूते हा आदिवासी भिल्ल या समाजाचा असून एस.टी या प्रवर्गात शिष्यव्रती धारक असून दयानंद विज्ञान महाविद्यालयात २०२० ते २०२२या कालावधीत शासकीय कोठयातून अनूदानीत आकरावी / बारावी या अनूदानीत वर्गात प्रवेश मिळाला होता.२०२२ ला बारावी पास झाला. पुढील शिक्षण बीएससी प्रथम वर्षाकरीता लातूर येथील शाहू महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छीतो त्याकरीता दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे टि.सी ची मागणीसाठी अनेकवेळा विनंती अर्ज केले असता साठ हजार रुपयाची मागणी करण्यात आली.असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

अत्यत गरीब कुटूब असल्याने तेवढी रक्कम भरु शकत नाही. कारण मी आदिवाशी भिल्ल असून जंगालातील जडीबूटी विकून माझ्या मूलांचे शिक्षणाचा खर्च व कुटूंब भागवतोय असाही उल्लेख या निवेदनात करण्यात आला असून आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे म्हटलं आहे. मूलांच्या पूढील शिक्षणाकरीता टि.सी ची अंत्यंत आवश्यकता आहे.माझ्या मूलाचे नूकसान होवू नये महणून लवकरात लवकर टि.सी मिळावी म्हणून आपल्या स्तरावरुन दयानंद विज्ञान महाविद्यालयास व संस्थेस सूचना करुन आदेशीत करावे. माझ्याकडून आजपर्यंत दयानंद विज्ञान महाविद्यालय संस्थेकडे संबधीत विभागाकडे वीस हजार रुपये भरले आहेत. ते ही मला परत मिळावेत.अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा माझ्या मूलाची टिसी नाही मिळाली तर माझ्या सर्व कुटुबासहीत मी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे अमरण उपोषणास बसणार आहे असेही या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी कार्यालय शिक्षण विभागाला पाठविण्यात आलेल्या आहेत..