उस्मानाबाद : राज्यातील रक्ताचा तुटवडा दूर व्हावा,रुग्णालयातील गरजूंना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील लिमरा हेल्थ क्लब आणि श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ रोजी रक्तदान शिबिराचे शहरातल्या डीग्गी रोड लगत असलेल्या लिमरा हेल्थ क्लब येथे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जवळपास (४०)चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. रक्तदान करण्यामध्ये अजीम लदाफ, अब्दुल शेख, चंद्रकांत कुंभार,रामेश्वर सोमाणी,हमीद लदाफ,राजेंद्र बनसोडे,नावेद पिरजादे,राजू गुरव आदी युवकांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.श्रीकृष्ण रक्तपेढी चे डॉ सागर पतंगे, योगेश सोनकांबळे, सुशांत सावंत,विजय कवडेकर, किशोर खरोते आदींनी सदर शिबिर यशस्वीपणे राबविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
(सचिन बिद्री)