उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील पेटसांगवी कोणता समुद्र जवळगा बेट आणि परिसरात वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवड न करता असलेले जंगल पूर्णतः उध्वस्त करून त्याच ठिकाणी खोटी वृक्ष लागवड केल्याचे दाखवून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फैयाज पठाण यांनी पोलीस निरीक्षक श्री राठोड यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन दिले आहे.

पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात वनपरिक्षेत्र कार्यालय, उमरगा तालुक्यातील पेठसांगवी, व्हंताळ, समुद्राळ, जवळगाबेट आणि इतर गावाच्या हद्दीत ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सन१९ या वित्तीय वर्षात मौजे पेठसांगवी हद्दीत गट क्र. १४८, १५० येथे वृक्ष लागवड खोटे दाखवून सन १९ से २० व २२या काळात शासनाने निर्देशित दिलेल्या नियमांचे उल्लघन करून सदर वृक्ष लागवड पुर्ण झाल्याचे खोटे मस्टर भरून शासनाच्या निधीचा उमरगा वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या कडून पदाचा व शासन निधीचा गैरवापर झालेला आहे.
तसेच सदरील काम गोरगरीब मजुरामार्फत किंवा रोजगार हमी योजन अंतर्गत काम करून घेणे आवश्यक होते. परंतु संबंधित काम यंत्राव्दारे लगबगिने उरकुन घेऊन बोगस कामे झालेली आहेत. झाडे लावताना किती अंतर असावे खड्डा किती खोलीचा असावा याचे ताळमेळ न घालता घाई गडबडीने यंत्रामार्फत (जे.सी.बी.) मार्फत खड्डे करून तोडकी मोडकी मोजकीच झाडे लावून काम पुर्ण झाले असे चित्र उभारून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल, वनरक्षक कर्मचाऱ्यांनी या सर्वांनी सगंमत करून शासनाच्या रकमेचा अपहार केला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
विषयांकीत गटा प्रमाणे दर्शिवलेल्या ठिकाणचे पंचनामे होणे गरजेचे आहे. सदरचे पंचनामे होताना समितीचे कार्यकर्ते यांच्या समक्ष व्हावे आशि समितीची मागणी आहे, योग्य व न्यायाचे होईल.तरी विनंती की समितीने केलेल्या तक्रारी अर्जावर आठ दिवसाच्या आत म्हणजे दि . २२ पर्यंत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत अन्यथा समितीस लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक २७ रोजी एक दिवसीय लाक्षणिय उपोषण करणे आणि मिडीया मार्फत चित्रीकरण करून सत्यपरिस्थीती उजेडात आणून भांडेफोड करील. प्रकरणी प्राधान्याने चौकशी पथक नेमन्याचे आदेश व्हावेत कोठ्यावधी रूपयाचे झालेला भ्रष्टाचार गोपनीयतेने चौकशी होऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी व इतरांना निलंबीत करून चौकशी व्हावी ही समितीची मागणी आहे आणि झालेल्या कार्यवाही वृत्तांत सेलला ज्ञात करावा ही नम्र विनंती.
उपरोक्त प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता व वृक्षारोपन झाडे कोठुन खरेदी केली किती लावली आज मितीस झाडाचे संगोपन, देख-रेख व जोपासना झाली का हे महत्वाचा आहे. तेव्हा उचित व त्वरीत चौकशी करून संबंधितावर त्वरीत गुन्हे दाखल करावेत . अशी मागणी करण्यात आली आहे .