निसर्गरम्य जंगलाची कत्तल करून तेथेच दाखवली खोटी लागवड..
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने कोट्यावधी वृक्ष लागवडीच्या जाहिराती मागे दडलेलं खरं सत्य समोर आले असून तालुक्यातील पेठसांगवी ,व्हंताळ ,समुद्राळ, जवळगा बेट या परिसरातील निसर्गरम्य वनराई ची कत्तल करून त्याच ठिकाणी पुन्हा खोटी वृक्ष लागवड दाखवून कोट्यावधीत रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आल्याचे चित्र दिसत आहे याप्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीद्वारे तक्रारी अर्ज देत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून निलंबित करण्याचे मागणी करण्यात आली आहे अन्यथा अखिल भारतीय ष्टाचार निर्मूल समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको व उपोषण करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे की,सदरील काम गोरगरीब मजुरामार्फत किंवा रोजगार हमी योजने अंतर्गत काम करून घेणे आवश्यक होते.परंतु संबंधित काम यंत्राव्दारे लगबगिने उरकुन घेऊन बोगस कामे झालेली असून झाडे लावताना किती अंतर असावे खड्डा किती खोलीचा असावा याचे ताळमेळ न घालता घाई गडबडीने यंत्रामार्फत (जे.सी.बी.) मार्फत खड्डे करून तोडकी मोडकी मोजकीच
झाडे लावून काम पुर्ण झाले असे चित्र उभारून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल,वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी या सर्वांनी सगंमत करून शासनाच्या रकमेचा अपहार केला असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
विषयांकीत गटा प्रमाणे दर्शिवलेल्या ठिकाणचे पंचनामे होणे गरजेचे आहे. सदरचे पंचनामे होताना समितीचे कार्यकर्ते यांच्या समक्ष व्हावे आशि समितीची मागणी करण्यात आली आहे.समितीने केलेल्या तक्रारी अर्जावर आठ दिवसाच्या आत म्हणजे २२ जुलै पर्यंत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत अन्यथा समितीस लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक २७ जुलै रोजी रास्तारोको / उपोषण करन्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.या प्रकरणी प्राधान्याने चौकशी पथक नेमन्याचे आदेश व्हावेत कोठ्यावधी रूपयाचा झालेला भ्रष्टाचार गोपनीयतेने चौकशी होऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी व इतरांना निलंबीत करून चौकशी व्हावी ही समितीची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता व वृक्षारोपन झाडे कोठुन खरेदी केली व किती लावली आज मितीस झाडाचे संगोपन, देख-रेख व जोपासना झाली का..? हा मुद्दा महत्वाचा आहे. तेंव्हा उचित व त्वरील चौकशी होणे बाबत विनंती करण्यात आली आहे. सदर निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रदेशाध्यक्ष शिंदे काशीनाथ तुकाराम यांच्यासह मराठवाडा अध्यक्षा वृन्दावणे गवळी, रसूल सय्यद, इसाक शेख, अझहर कागदी, विरामचंद्र गावडे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.