धोंडीप्रकरणात कारवाई न झाल्यास जनमाणसात प्रशासनाची प्रतिमा मलिन होन्याची शक्यता

वाशिम:-कारंजा तालुक्यातील मसला येथील शाळकरी मुलांकडुन अंगाला पालापाचोळा बांधुन वरुणराजाला साकडे घालत शिक्षकाकरवी धोंडी मागीतली.याचे तिव्र पडसाद जिल्हाभर ऊमटल्यानंतर शिक्षण विभागाकडुन कारणे दाखवा नोटीस बजावली व जिल्हा महिला बालकल्याण विभागाकडुनही चौकशी केली.परंतु सध्या दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कळते.सदर धोंडी प्रकरण पाठीशी घालुन दडपण्याचा प्रकार वरिष्ठाकडुन होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असुन सेटलमेंटने धोंडी दाबन्यात आली तर अंनिस कायद्याची पायमल्ली होवुन सवैधानिक प्रशासनावरचा लोकांचा विश्वास ऊडेल त्यामुळे सदर शिक्षकाला कायद्याचा धडा शिकवाच अशी सुज्ञ नागरीकांमधुन मागणी होत आहे.
कारंजा तालुक्यातील मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे यांनी शाळकरी मुलांकडुन धोंडी मागुन वरुणराजाला पावसासाठी साकडे घातले.हे कृत्य करीत असतांना काही शाळकरी मुलांच्या अंगातील कपडे काढून,त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला गावभर फिरविणे आणि अस्तित्वात नसलेल्या भ्रामक कपोल कल्पित गोष्टीचा प्रसार करीत पाण्यासाठी धोंडी मागण्याचे आणि असे गावात फिरल्याने पाणी येते अशी अविवेकी अंधश्रद्धा आणि तस्संम बाबीला खतपाणी घालणारी घटना कारंजा तालुक्यातील मसला गावामध्ये घडली आहे. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये अंनिस ,पत्रकार ,शिक्षक संघटना,जनता यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. यामध्ये बनारसे यांना गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली होती तसेच जिल्हा महिला बालकल्याण विभागाकडुनही चौकशी झाली. त्यामध्ये शिक्षक बनारसे यांनी आपला खुलासा गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे दिला या प्रकरणांमध्ये संपूर्ण जिल्हा वाशियांचे लक्ष या प्रकरणांमध्ये लागून दिसत आहे.धोंडी प्रकरणात प्रशासनाकडुन सेटलमेंट होते का? किंवा कारवाई होते याकडे संपीर्ण जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण विभाग व जिल्हा महिला बालकल्याण विभागाचा अहवाल सादर
धोंडीप्रकरणात जिल्हाभर तिव्र पडसाद ऊमटुन प्रसिध्दी माध्यमातही बातम्या प्रकाशीत झाल्या याची प्रशासनाने त्वरीत दखल घेवुन सबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावुन ऊत्तर मागीतले त्यावर कारंजा शिक्षण विभागाने पुढील कारवाईसाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.)वाशिम व मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे अहवाल पाठवला असल्याचे सांगीतले.सोबतच शाळकरी बालकांकरवी अंगाला पाला बांधुन गावभर धोंडी काढून अंधश्रध्दा पसरवल्याप्रकरणी जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या टिमनेही स्पाॅटवर भेटी देवून चौकशी करुन आपला अहवाल शिक्षण विभाग वाशिम व जिल्हाधिकारी यांना पाठवला.या दोन्हीही अहवालावरुन सबंधित शिक्षकावर कोणती कारवाई करतात की प्रकरण परस्पर रफादफा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गावकर्‍यांच्या विनंतीवरुन विद्यार्थ्याकरवी धोंडी मागीतल्याचे गुरुजींचे केविलवाणे ऊत्तर
गावातुन विद्यार्थ्यांची शाळाप्रवेश दिंडी सुरु असतांना शेतकर्‍यांचा गट येवून गावात पाऊस नाही म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांकडुन धोंडी काढून वरुणराजाला साकडे घाला यावरुन धोंडी काढल्याचा खुलासा सदर शिक्षकाने दिल्याचे कळले.सोबतच चुक कबुल करुन माफीही मागीतली.जर धोंडी काढुन पाणी येते या भ्रामक कल्पनेत विद्यार्थ्यांना गोवून अंधश्रध्दा पसरवली,विद्यार्थ्यांच्या अंगाला पाला बांधुन ऊघडे,अंगावर पाणी टाकत गावभर हिंडवले त्यामुळे बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऊद्भवतो.आपल्या शैक्षणीक कार्यातच सदर ऊपक्रम बसत नसुन यामुळे भ्रामक कपोल कल्पना बालमनात ऊत्पन्न होतात हे गुरुजी महाशय विसरलेले दिसते.अनेक शैक्षणीक ऊपक्रम असतांना नेमकी धोंडीच का मागीतली हा ही प्रश्न आहे.संपुर्ण गावकरीही एखादी चुकीची कृती शिक्षकाला करायला सांगत असतील परंतु शिक्षक सुज्ञ असतो व समाजातील जबाबदार आणी सर्वोच्च स्थानी असतो तरीही सदर गुरुंजींना आपणाकरवी अंनिस कायद्याचा भंग होतोय ही सुबुध्दी आली नसेल का?की जानूनबुजुन धोंडी काढली आणी प्रकरण अंगलट आले तर विध्दार्थी आणी पालक व गावकर्‍यांना ढाल बनून सावरासावर करत आहेत हे सर्व जिल्ह्याला दिसलेच आहे.वरिष्ठांनी कुठलीही गय न करता सदर शिक्षकाला निलंबित करावे अन्यथा जिल्ह्यात आंदोलन ऊभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्तव्यदक्ष सिईओ मसल्याच्या शिक्षकाची गंभीर चुक कदापीही पाठीशी घालणार नसल्याची चिन्हे
भ्रामक कल्पनांना जन्म देणारी धोंडी मसल्याच्या शिक्षकांनी काढुन अंनिस कायदा आणी बालकांच्या जिवाशी खेळल्याचा गंभीर प्रकार झाल्यामुळे सर्व बाजुंनी तिव्र पडसाद ऊमटत बनारसे नावाच्या शिक्षकांना कायद्याचा धडा शिकवण्याची चहूबाजुंनी मागणी झाल्यामुळे वाशिमच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी कदापिही पाठीशी घालुन प्रकरण रफादफा करण्याच्या मनस्थीतीत नसल्याचे कळले.सदर शिक्षकाला निलंबित न केल्यास अंनिस कायद्याची पायमल्ली होवून असंवैधानिक कृतीला बढावा मिळेल त्यामुळे प्रशासनाची प्रतीमा मलिन होवू शकते त्यामुळे त्वरीत कायदेशीर कारवाई करणे भाग आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *