लातुरचा सुदर्शन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट भ्रमंती करतोय,आणी वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी ‘धोंडी’ मागताहेत
वाशिम : महाराष्टातील लातुर जिल्ह्यातील वृक्षकटाई आणी सिमेंटच्या रस्त्यामुळे भिषण पाणीटंचाई बघता ध्येयवेड्या सुदर्शनने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा वसा घेत जनजागृतीसाठी महाराष्ट भ्रंमतीवर निघालेला असतांना वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात तो पोहचला असता त्यांचे स्वागत करुन जनजागृतीबाबत कौतुक केले आहे.

एकीकडे वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन खुप महत्वाचे आहे,झाडांची संख्या कमी असल्यामुळे पाऊस येईनासा झाला हे मर्म सुदर्शनला ऊमगले,पावसासाठी झाडे महत्वाची आहेत,वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे हे महत्व सांगणे दुरच परंतु वाशिम जिल्ह्यातील काही येडे पावसासाठी वरुन राजाला साकडे घालण्यासाठी ‘धोंडी’ मागत आहेत आणी बालमनावर भ्रामक कल्पना व अंधश्रध्दा कोरण्याचे पातक करीत असुन अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. विपरीत घटनेतून ध्येयांची उत्पती होते, असे म्हटले जाते. सन २०१६ मधील लातूर जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई ही एका तरुणाच्या मनाला चटका लावून गेली. परीणामी, त्या तरुणाच्या मनामध्ये वृक्षसंवर्धनाचे ध्येय निर्माण झाले. अन् त्यातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनाचा संकल्प घेऊन राज्यभर जनजागृतीसाठी सायकलीने भ्रमंतीसाठी निघालेला तरुण सुदर्शन उद्धव भांदर्गेचा ध्यास गौरवणीय आहे. महाविद्यालयीन शिक्षणाचे वय असलेला हा तरूण शहरोशहरी फिरून वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी सायकल यात्रेवर निघालेला आहे.

नुकताच दि.19 जुलै ला मंगरुळपीर येथे येऊन गेला. या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यात आला.लातूर जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वी पाणीटंचाईची समस्या बिकट बनली होती. क्राँक्रिटीकरण्याच्या ऊद्रेकाचा चटका निसर्गाला बसला. वातावरणात कमालीचे बदल झाले. परीणामी, पावसाचे कमी-अधिक प्रमाण झाले.दिवसेंदिवस कमी झालेली वृक्षांची संख्या मानव समाजाची चिंता वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. म्हणून बी. कॉम. च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सुदर्शन भांदर्गेने वृक्षांची संख्या वाढली पाहिजे व त्याचे संगोपण झाले पाहिजे तसेच याबाबत जनसामन्यांत जागृती व्हावी यासाठी राज्यात फिरण्याचा संकल्प केला. २८ मे २०२२ घरून निघालेला हा ध्येयवेडा तरूण सायकलने लातूर-उस्मानाबाद-सोलापूर-सांगली-कोल्हापूर-सातारा-रायगड-मुंबई- नवी मुंबई-ठाणे-पालघर-नाशिक-पुणे-अहमदनगर-औरंगाबाद-जालना- धुळे-नंदुरबार-जळगाव- बुलढाणा-अकोला अमरावती-नागपूर यवतमाळच्या जिल्ह्यातून बाभूळगाव येथुन मंगरुळपीर शहरात बुधवारी पोहचला. शहरातील सामाजीक कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करत वृक्षलागवड व संवर्धन जगजागृती मोहीमेबद्दल कौतुक करुन मनोबल वाढवले. लातुरसारखी भिषण पाणीटंचाई बघता एक तरुण महाराष्टभर फिरुन वृक्षलागवड व संवर्धनासाठी जनजागृती करतोय आणी वाशिम जिल्ह्यातील काही येडे पाऊस पडावा म्हणून शाळकरी मुलांच्या अंगाला पाला बांधुन गावभर फीरुन धोंडी मागताहेत.अजुनही अंधश्रध्देचे मळभ काहींच्या डोक्यातुन गेले नसुन अंनिसच्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाल्याशिवाय व कायद्याचा दणका बसल्याशिवाय अंधश्रध्दाळु भानावर येणार नाहीत.अडाणी तर दुरच पण शिकलेलेही पाऊस कशामुळे पडत नाही हे विसरुन धोंडी मागतात त्यांच्या बुध्दीची खरच कीव करावीशी वाटते.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206