सोलापूर – यशराज भारतीय कला प्रसार यांच्या विद्यमाने स्वर सम्राट स्व. मोहम्मद रफी यांच्या ४२ व्या पुण्यतिथी निमित्त गायक मोहम्मद अयाज यांनी पहाडी आवाज लाभलेल्या रफी साहेबांना स्वरांजली म्हणून रफी के रंग हा रिमीक्स अल्बम बनवले आज ३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफी जगाचा निरोप घेतला होता. भारतीय चित्रपट संगीत सृष्टीचे गायक अनेक वर्षे आपल्या आवाजाच्या माध्यमातून जगभर मनामनात अधिराज्य गाजवले. मोहम्मद अयाज हे रफी साहेबांना गुरु स्थानी मानुन गायनाची कला जोपासली आज अयाज त्यांच्या नावानेउ जगभर कार्यक्रम करत असुन प्रती रफी म्हणुन त्यांची ओळख आहे . एक मानाचा मुजरा म्हणून हा अल्बम प्रकाशित करण्यात आला.मुझीक अरेंजर साहीर नदाफ असुन ध्वनिमुद्रण प्रकाश माने यांनी केले हा अल्बम सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर आरिफ शेख सिध्देश्वर बंकेचे चेरमन व शहर अध्यक्ष प्रकाश वाले , सिध्देश्वर साखर कारखाना चे चेरमन पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते , मुस्तारे , अकबर शेख, शब्बीर शेख सह मान्यवर उपस्थित होते …