पुणे : इंदापुर ता. डिकसळ येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळांनी भरणेवाडी येथील निवासस्थानी मा. दत्तात्रय भरणे मामा यांची भेट घेतली.
या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा मा.दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी येथे त्या मंडळींना फेटा व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा मा. दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे