section and everything up until
* * @package Newsup */?> साहेब तुम्ही तर घरावर झेंडा लावण्याला सांगितले…आता कोटी झेंडा लावू... | Ntv News Marathi

गोंदिया – संपुर्ण गोंदिया जिल्हात सतत पावसाचा हाहाकार आहे. अनेकांची घरे पडली, नदी नाले ओसंडुन वाहुलागे, धरनांचे दार उघडले, गावात पुर परिस्तीती निर्मान झाली, तर अनेक ग्रामीन भागासह महामार्ग बंद पडले. देवरी शहरातही असीच परिस्तीती निर्मान झाली प्रशासकीय अधिकारी यानां १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्य महोत्सव साजरा करायचा की नागरीकानां सहकार्य करायचा हेच समजेनास झाल. याचीच सत्यस्थीती गोंदिया जिल्ह्याच्या देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी पाटनकर यानीं आपल्या लेखनीतुन मांडली आहे.

15 ऑगस्ट स्वातत्र्यं दिनाचा दिवस पहाटे 5 पासूनच फोन खनखन करायला लागला साखर झोपेत असल्याने सुरुवातीला गांभीर्य समजले नाही, काही वेळातच नगरअध्यक्षांचे , नगरसेवक , नागरीकांचे ही मिस कॉल पडले, काही घरा मध्ये पाणी घुसले आहे, काही घर पडले आहेत, काही लोक ढिगाऱ्याखाली फसली आहे आणि बरेच काही अशी हादरून टाकणारी माहिती मिळाली. लगेच बाल्यावस्थेत असणार्‍या आमच्या अग्नीशमन विभागाला संपर्क साधून स्पॉट वर पोहोचण्यास सांगितले.

ध्वजा (dhwaja) रोहण कार्यक्रम असल्याने त्याच्या तयारीची लगबग ही चालू होती. स्पॉट वर पोहोचल्या वर अग्नीशमन विभागाने अत्यंत जलद गतीने काम करण्यास सुरवात केली. बरोब्बर स्वछतां विभाग ही कामाला लागला. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे घर पत्याच्या खेळा सारखी कोसळत होती. लोकांचे धाय मोकलून रडने बघून काळजाला तडा जात होता. आपोआप आमच्या ही अश्रूं ना बांध फुटत होता. आम्ही आमच्या परीने लोकाना स्थलांतरित करण्यात, इतर सोय करण्यात व्यस्त होतो. त्यातच एक वयोवृद्ध सुरकुतलेल्या चेहर्‍या चि म्हातारी जवळ आली अणि म्हणाली ,साहेब तुम्ही तर घरावर झेंडा लावण्याला सांगितले… आता कोटी झेंडा लावू ??..असे बोलून तिने आपल्या अश्रूं ना वाट मोकळी करून दिली. आम्ही मात्र अनुत्तरीत झालो. एवढ्या सगळ्या परिस्थितीत आमचे ऑफिस च्या झेंडा वंदनाला उपस्थित राहणेच राहून गेले. आमच्या अध्यक्षांनी ते अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण केले.

प्रशासनान/पदाधिकारी आपल्या परीने मदत करण्याचा, धीर द्यायचा प्रयत्न करत आहेतच. परन्तु त्या मोडलेल्या संसाराना दातृत्वाची खूपच गरज आहे. त्यांना जगण्याची प्रेरणा मिळण्यासाठी सर्वांच्या पाठबळाची नितांत गरज आहे. त्यावर नागरीकानां ऐकमेकानां सहकार्य करन्याचे आव्हान देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी पाटनकर यानीं केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *