(तलासरी)
मा. श्री. निलेशजी सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गावोगावांतील रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. अशाच ग्रामीण भागातील एका युवकाच्या उपचारांकरिता जिजाऊ संस्थेने आर्थिक मदत केल्याने त्याचा इलाज शक्य झाला आहे.

काही दिवसांपूर्वी डोंगारी पाटीलपाडा येथील १८ वर्षीय युवक अल्केश बारक्या राबड हा काही दिवसांपूर्वी मोटार सायकल वरून जात असताना दुर्दैवाने त्याचा अपघात झाला. अल्केशला दुखापत झाल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचा खर्च मोठ्या प्रमाणात झाला, परंतु राबड कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना हा खर्च परवडणारा नव्हता. जिजाऊ संस्थेला या परिस्थितीची माहिती मिळताच, ‘मदत नाही तर कर्तव्य’ या भावनेने त्याच्या उपचारांकरिता त्वरित ₹२०,००० मदत करण्यात आली. अल्केशचे उपचार शक्य झाल्याने, संपूर्ण राबड परिवार भारावून गेले आणि त्यांनी जिजाऊ संस्था व सांबरे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.

याप्रसंगी, वनश्या दुमाडा (माजी प. स. सभापती), सामाजिक कार्यकर्ते लाडक खरपडे, रंजीत कोम, जयेश वळवी, जयवंत ठाकरे, मनोज अंधेर, दिपक गोरात तसेच जिजाऊ परिवारातील सदस्य जावेद खान, पंकज वसावे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *