लातूर : दि. ६ जुलै २०२१ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान नियोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी “समर्थ बूथ अभियान” तिसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली असून त्या अंतर्गत लातूर शहर जिल्हा बैठक संपन्न झाली. एक परिवार म्हणून नव्याने संघटन बांधणी करणे, बूथ संरचना पुनर्गठन, शक्तिकेंद्र प्रमुख नेमणूक आदी विषयांसाठी लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक महत्त्वपूर्ण ठरली. उपस्थित विभागीय संघटन मंत्री श्री. संजयजी कोडगे, शहर जिल्हाध्यक्ष श्री. गुरुनाथजी मगे, संघटन सरचिटणीस श्री. मनीषजी बंडेवार, मनपा गटनेते श्री. शैलेषजी गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती श्री. दीपकजी मठपती, सरचिटणीस श्री. शिरीषजी कुलकर्णी, श्री. दिग्वजय काथवटे, श्री. प्रवीणजी सावंत, भाजयुमो लातूर अध्यक्ष श्री. अजित पाटील कव्हेकर जी, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. जयश्रीताई पाटील, भाजयुमो प्रदेश सचिव सौ. प्रेरणाताई होनराव, शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. मीनाताई भोसले, प्रदेश व्यापारी आघाडीचे श्री. सुधीरजी धुत्तेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वातीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी अमोल गिरी
लातूर 8999764233 /8806113444