बुलढाणा : मलकापूर शहर पोलीस स्टेशनला लागून असलेल्या विष्णूवाडी परिसरातील दिलीप भोळे यांच्या शौचालयाच्या टाक्याच्या स्लॅबवर गाय गेली अचानक स्लॅब तुटल्याने आज सकाळी ती गाय टाक्यात पडली त्या गायीची टाक्यातुन बाहेर निघण्यासाठीची धडपड पाहून परिसरातील नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली
याबाबतची माहिती स्थानिय नागरिकांनी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांना दिली,क्षणाचाही विलंब न लावता हरीश रावळ जे.सि.बि सह गुल्ली ऍम्पायर घेऊन दत्तु टाक,आरोग्य विभागाचे मिलिंद कंडारकर,आरोग्य जमादार यशवंत जगताप, संतोष टाक, अमर निथाने,अग्निशामन दलाचे वासुदेव भोपळे, कृष्णा निथाने, धनराज काकर,कृणाल वाघरे,विजय काळे,विजय शर्मा, संदीप पाटील,राजु शर्मा,सुशील शर्मा, महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले, शौचालयाचे टाके खाली करून तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबीच्या साह्याने न प कर्मचाऱ्यांनी शौचालयाच्या टाक्यात उतरुन गाईला बाहेर काढून तिचे प्राण वाचविले टाक्यातून गाय बाहेर येताच गाईने तिच्या घराकडे धूम ठोकली.स्थानिय नागरीकांनी नगराध्यक्ष,न.प.कर्मचारी व मदतकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.