बरबसपुरावासीयांची आ.रहांगडाले यांच्याकडे मागणी…

गोंदिया : मुंबई हावडा रेल्वे मार्गावर तिरोडा ते गोंदिया दरम्यात बरबसपुरा ते एकोडी रस्त्यावर गेट क्र.LC-517 A-3E येथे रेल्वे प्रशासनातर्फे आवागमन करण्यासाठी सद्यास्थितीत फाटक असून या मार्गावर रेल्वेची वर्दळ जास्त असल्याने भूमिगत रेल्वे रस्ता मंजूर असून याकरिता ग्रा. प. तर्फे ना-हरकत देतांना सरपंच महोदयांनी नागरिकांना सूचना न देता, ना हरकत दिली तसेच या रस्त्यावर अदानी प्लांटमध्ये तसेच गोंदिया येथे दररोज हजारो कामगार व कर्मचारी ये जा करित असतात. भूमिगत रस्ता बनल्यास मोठ्या प्रमाणात अडचणी उद्भवणार आहे. याची दखल घेत गावकऱ्यांनी सदर जागी भूमिगत पुलीयाचे बांधकाम न करता ओव्हरब्रिजचे बांधकाम करण्याबाबतची मागणी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचे कडे केलेली आहे. यावर आमदार महोदयांनी वरिष्ठासोबत चर्चा करून मार्ग काढण्याबाबत आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी निवेदन देतेवेळी रमेश भाऊ कोकूड़े, राजू भाऊ थानसिंह, राजेश परिहार, तेज राम चौधरी, सुनील चौधरी, जगलाल पटले, त्रिवेंद्र पारदी, गोपाल नेवारे, दशरथ विशेष, कैलाश असाटी, राहुल पटेल व सर्व गावकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *