गोंदिया ; ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 सुरु करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी (वयोमर्यादा 60 वर्षे) राष्ट्रीय हेल्पलाईन चालवली जात आहे. या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तिची काळजी घेणे हा आहे. गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात आला आहे की, आपल्या समस्या / तक्रारीच्या निवारणासाठी टोल फ्री क्रमांक 14567 या क्रमांकावर संपर्क साधावा.