गोंदिया : व्यवस्थापनाच्या दृष्टीने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत बंद ठेवण्यात आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्प 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार पर्यटन रस्त्यांची स्थिती पाहून नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑफलाईन असणार आहे. 16 ऑक्टोबर 2022 पासून व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑनलाईन पध्दतीने नियमीत सुरु करण्यात येणार आहे. सध्या पर्यटनाचे प्रवेश शुल्क, वाहन शुल्क, कॅमेरा शुल्क, गाईड शुल्क व इतर शुल्कात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांनी कळविले आहे.