औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदातांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गाव चे नायक हरलाल नायक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आणि नांदातांडा ग्रामपंचायत चे सरपंच मोरसिंग चव्हाण यांच्या हस्ते ग्रामपंचायत मधे ध्वजारोहन करण्यात आले १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहन चा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता या सांस्कृतिक कार्यक्रमाला नांदातांडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
ध्वजारोहन कार्यक्रमाला सरपंच मोरसिंग चव्हाण , वरदानसिंग चव्हाण , शाळेचे मुख्याध्यापक लालसिंग राठोड , हरलाल नायक ,गुरुमुख जाधव , ममराज जाधव , प्रकाश राठोड , व ग्रामपंचायत चे आणि शाळेचे सर्व कर्मचारी , शेतकरी, आणि गावकरी उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद