देवरी : आज दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. राजेशजी पांडे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र समिती, गोंदिया तसेच प्रमुख अतिथी मा. श्री. विनोदजी मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया, मा. श्रीमती निवेदिता बघेले, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया, मा. श्री. अंकुशजी अतकरे, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया, मा. श्री. आशिषसिंग खतवार, प्राचार्य, सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देवरी, मा. श्री. उपदेशजी लाडे, प्राचार्य, सी. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, देवरी हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख अतिथी यांनी जात वैधता प्रमाणपत्र, भारत सरकार शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समान संधी केंद्र, महाविद्यालयीन स्तरावर अर्ज स्वीकारणे इत्यादी विषयांबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा देवरी तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधीत कर्मचाऱ्यांकरिता आयोजित करण्यात आली. याप्रसंगी या कार्यक्रमाचे संचालन श्री. एम. एम. तरोणे सर तसेच आभार प्रदर्शन श्री. उपदेशजी लाडे यांनी केले. एकंदरीत सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आयोजित कार्यशाळा शांतपणे सुव्यवस्थितपणे पार पडली.