गोंदिया : देवरी तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमाकं -६ वर व मुरदोली गावात कार्यरत असलेल्या अग्रवाल ग्लोबल कपंनी तर्फे श्री महावीर जयंती उत्साहात साजरी केली गेली.
सकाळी कपंनीमधील दिगंबर जैन मंदीरात भव्य सजावटीचे आयोजन केले गेले. या मध्ये कपंनीचे कर्मचारी व कामगार यांच्या कडुन पारंपरिक पध्दतीने पुजा करत आरती करन्यात आली. याकार्यक्रमात स्थानीक जनप्रतीनीधी, कंपनीचे अधिकारी , कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी अग्रवाल ग्लोबल कमपनीचे प्रमोद पांडे , विशाल येडके, रमा रंजन, धनंजय पालीवाल, बिपीन श्रीवास्तव, रंजीत रॉय, धर्मराज प्रशांत वर्मा, जनराय, उपसतीत होते. अग्रवाल ग्लोबल कंपनी च्या वतीने महावीर जयंती निमीत्त सगळ्या कर्मचारी व कामगार वर्गासाठी प्रसादभोजनाचे आयोजन केले गेले.