निकृष्ठ बांधकाम खोदून नव्याने रस्ता बांधकामाचे आदेश दिले….
देवरी:-
नगरपंचायत देवरी येथील प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या दर्जावरून संतप्त नागरिकांनी बांधकाम रोखले. नपं.चे अभियंता ए डी झिरपे यांनी कार्यस्थळी भेट देऊन सदर कंत्राटदारास निकृष्ठ रस्ता त्वरित काढून नव्याने रस्ता बांधकामाचे आदेश देत सुटीच्या दिवसी काम न करण्याची सक्त ताकीद दिली.
देवरीतील प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे 15 लाख रुपयांच्या 320 मीटर रस्ता बांधकामाचे कंत्राट तेजराम मदनकर यांना मिळाले आहे. कंत्राटदाराने सतत येणाऱ्या सुट्यांचा फायदा घेत घाईगडबडीत रस्ता बांधकामाला सुरवात केली. मात्र, रस्त्याचे बांधकाम अत्यंक निकृष्ठ होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत आपला विरोध दर्शविला. अनेक ठिकाणी मटेरिअल कमी वापरत रस्त्याची जाडी कमीजास्त करीत अंदाजपत्रकातील तरतूदींचे उल्लंघन केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष संजू उईके आणि प्रभाग क्र. 9च्या नगरसेविका कमल मेश्राम यांना पाचारण केले. मात्र, पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे समाधान केले नसल्याचे सांगत उलट नागरिकांनीच रस्त्यावर पाणी शिंपडले पाहिजे, असे म्हटल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. परिणामी, नागरिकांनी रस्ता बांधकाम रोखत बांधकाम अभियंत्याला कार्यस्थळी बोलाविले. अभियंता श्री झिरपे यांना या बांधकामाला भेट दिली असता त्यांनी रस्त्याच्या जाडीला घेऊन कंत्राटदाराची चांगलीच कानउघाडणी करीत झालेले बांधकाम काढून नव्याने रस्ता बांधकाम करण्याचे आदेश दिले. यावेळी वस्तीतील नागरिक, अधिकारी, प्रभाग क्रमांक10 चे नगरसेविका टेंभरे आदी उपस्थित होते. उल्लेखनीय म्हणजे सुटीच्या दिवसी बांधकाम न करण्याच्या सूचना सुद्धा श्री झिरपे यांनी संबंधित कत्राटदाराला दिल्या.

प्रतिक्रीया
संबधित कंत्राटदाराला बनविलेला सिमेटं रस्ता उखडुन नव्याने बनविन्याचे आदेश दिले आहे. त्यावर त्या कंत्रांटदारानी जर अमल बजावनी केली नाही तर त्याचा काम रद्द करन्यात येईल.
अक्षय झिरपे (अभि.नप.देवरी)