गोंदिया :- जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुरदोली येथे अग्रवाल ग्लोबल कंपनी मागील दोन वर्षापासुन स्थापीत आहे. महामार्गावरील उडान पुल (ओव्हर ब्रीज) बांधन्याचे काम त्यांनी साकोली ते शिरपुर/बांध गावापर्यंत हाती घेतले आहे. येथे काम करणाऱ्या जवळपास ४०० कामगारांचा तिन महिन्यांचा पगार रखडला आहे. तर सोबतच त्या कंपनीत कार्यरत असलेल्या अधिकार्यांचाही पगार रखडल्याने कामगार व अधिकारी यांच्यात कंपनी विरोधात संतापाची लाट निर्मान झाली आहे.

अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या कामगार व कर्मचार्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीने कामगार व कर्मचार्यांचा थकलेला पगार लवकर देन्यात यावा यासाठी कामगारांनी कामबंद करुन उपोसन करन्याचा ठरविला आहे. जर दोन दिवसात अग्रवाल ग्लोबल कपंनीने कामगार व कर्मचार्याचें पगार जमा न केल्यास येत्या सोमवारला अग्रवाल ग्लोबल कपंनी समोर कंपनीतील सपुर्ण कामगार जोपर्यंत कामाचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करत उपोसनावर बसनार असल्याचा ईसार कंपनीच्या वरिष्टानां दिला आहे.
देवरी शहरा पासुन काही अंतरावरच मुरदोली येथे अग्रवाल ग्लोबल कंपनीने १० ते १२ एकरावर यार्ड तयार केले आहे. शेतकर्यांकडुन लिजवर जागा घेऊन कंपनीने येथे उडान पुल तयार करन्याकरीत लागनारे साहीत्य जमा करन्याकरीता मशिने व कार्यालय तयार केले. या कंपनीमुळे स्थानीक व बाहेरील कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला पंरतु रखडलेल्या पगाराने संपुर्ण कंपनीच्या कामगरात संतापाची लाठ निर्मान झाली आहे. दोन-दोन, तिन-तिन महिने सतत पगार रखडत असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे कामगार सांगतात. कमपनित कार्यरत अधिकार्यांशी पगारा संदर्भात विचारना केली असता उडवाउडवीची उत्तेरे देत असभ्य वागनुक करतात. जर दोन दिवसांत त्यांचा पगार दिला नाही तर येत्या सोमवार अग्रवाल ग्लोबल कंपनी समोर संपुर्ण कामगर व कर्मचारी यांच्या कडुन कामबंद आंदोलन व उपोसनाला सुरूवात करन्यात येनार आहे.