देवरी:-
स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट व करिअर प्लॅनिंगचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अशिषसिंह खतवार, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक श्री. ए. ए. बाजपेयी, अधिव्याख्याता कम्प्युटर टेक्नॉलॉजी, शासकीय तंत्रनिकेतन, साकोली तसेच श्री. आर. एल. मेश्राम, एकेडमिक इन्चार्ज, कु. व्ही. जी. दिवाने, प्रभारी विभागप्रमुख, अणुविद्युत अभियांत्रिकी, कु. एस. के. गावडकर, प्रभारी विभागप्रमुख, संगणक अभियांत्रिकी तसेच कु. जे. के.भेलावे, प्रभारी विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री. ए. ए. बाजपेयी यांनी आपल्या मार्गदर्शनातून जीवनात यशस्वी होण्यासाठी लक्ष ध्येय ठरवणे कसे महत्त्वाचे आहे याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या प्रोजेक्ट बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन कु. एम. एस. डोये मैडम तसेच आभार प्रदर्शन कु. एस. एल. सोनेवाने मैडम यांनी केले. एकंदरीत या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
