पुणे : रब्बी हंगाम पिक उत्पादन वाढ मोहीमेंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आळंदी म्हातोबाची येथील खटाटेवस्तीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

रब्बी हंगामातील भाजीपाला ,गहू या पिकांच्या उत्पादन वाढ ,तंत्रज्ञानाबाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक हडपसर -१मेघराज वाळूंजकर यांनी माती परिक्षण, जमिनीची सुपिकता बियाणे निवड, पेरणी वेळ, पेरणीची पद्धत शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांचा वापर ,तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन,किड रोग नियंत्रण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, शेतकरी गट निर्मिती, व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतमाल विक्रीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. रब्बी ज्वारी पिक उत्पादन वाढ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग यांनी रब्बी ज्वारी प्रकल्प, सिताफळ छाटणी तंत्रज्ञान, सिताफळ किड रोग नियंत्रण, अंजीर लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, अंजीर किड रोग नियंत्रणाबाबत माहिती देवून वेस्ट डिकपोजर जिवाणू कल्चर निर्मिती ,प्रात्यक्षिक करताना पिक उत्पादनातील जिवाणूंचे महत्व यावेळी उपस्थित शेतक-यांसमोर विशद केले. कृषीसहाय्यक,श्रीमती सौरभ जाधव यांनी शेतकरी प्रशिक्षण वर्गाचा उद्देश सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विजय जवळकर, विश्वनाथ खटाटे, पांडूरंग खटाटे, ओंकार जवळकर, मारूती जवळकर, शिवाजी वाल्हेकर, दिलीप माकर, सुनिल केसकर, दिपक खटाटे ,दत्तात्रय भंडलकर, संतोष वाल्हेकर, कोंडीबा जवळकर, शरद जवळकर, आकांक्षा खटाटे, दिपाली खटाटे, अश्विनी खटाटे, सुजाता जवळकर, आशा भंडलकर, श्रद्धा खटाटे, सरस्वती वाल्हेकर कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *