गोंदिया : २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी एकुण २३ हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्हयातील वडसा वनपरिक्षेत्रातून
गोंदिया जिल्हयाच्या हददीमध्ये गाढवी नदी मार्गे प्रवेश करुन गोंदिया वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगांव वनपरिक्षेत्रातील कक्ष
क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करतांना शेत शिवारातून ब-याचदा जातात अशावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते. करीता शेतक-यांनी हत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास तात्काळ वन कर्मचा-यांशी किंवा वन कार्यालयाशी संपर्क करुन नुकसानीबाबतचे अर्ज सादर करावे. वनविभागाकडुन झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सदर हत्तींचा कळप २५ सप्टेंबर, २०२२ रोजी रात्री अर्जुनी मोरगांव वनपरिक्षेत्रातील खोळदा वरुन बंद्या, महागाव, सिरोली नहर मार्गे बुटाई नहरापर्यंत आला. नंतर २६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १३.३० वा. अर्जुनी मोरगांवसह-वनक्षेत्रातील बिट रामघाट १ कक्ष क्रमांक २५३ राखीव वनात प्रतापगड पहाडी वर हत्तींचे प्रत्यक्ष दर्शन झाले.
सद्याचे स्थळ निरीक्षण केले असता, अंदाजे तिन मार्गावरुन हत्तींचे मार्गक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोंदिया वनविभागामार्फत गस्तीचे व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. १) बुटाई, खैरी, सुकळी, बाराभाटी, कवठा, एरंडी २) प्रतापगड, गोठणगांव, तिबेट कॅम्प, चिचोली, दिनकर नगर इत्यादी, ३) कालीमाती, डोंगरगांव, कोहलगांव, जब्बारखेडा, धाबेपवनी मार्गे नवेगांव नॅशनल पार्क. हत्तींच्या नियंत्रणाकरीता रॅपिड रिस्पॉन्स टिम, नवेगांवबांध, गोठणगांव अर्जुनी मोरगांव या तिन्ही वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षण दल, पश्चिम बंगाल मधील हत्ती नियंत्रण पथक यांचे संयुक्तपणे नियोजन केलेले आहे.

नागरीकांना कळविण्यात येते की, हत्ती एका वनक्षेत्रातून दुस-या वन क्षेत्रात मार्गक्रमण करतो व हे त्याचे नैसर्गीक आचरण असून अशा परिस्थितीत मानवी हस्तक्षेप त्याचे मार्गक्रमात न झाल्यास हत्ती शांततेत निघुन जातात. हत्ती मार्गक्रमण करतांना शेत शिवारातून ब-याचदा जातात अशावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते. करीता शेतक-यांनी हत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास तात्काळ वनकर्मचा-यांशी किंवा वनकार्यालयाशी संपर्क करुन नुकसानीबाबतचे अर्ज सादर करावे. वनविभागाकडुन झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरीकांनी संयमाने हत्तींना त्यांचे मार्गक्रमणात सहकार्य करावे.

गोंदिया जिल्हयात दाखल झालेल्या कळपात लहान पिल्ले असल्याने मोठे हत्ती मानवी हस्तक्षेपामुळे बिथरु शकतात. हत्ती बिथरल्यास नियंत्रणात आणने कठीण होऊ शकतो. करीता पुन:श्च वनविभागाद्वारे नागरीकांना कळविण्यात येते की, कोणत्याही परिस्थितीत हत्तींच्या जवळ जाऊ नये, स्थानीक वनकर्मचारी द्वारा वेळो-वेळी मिळालेल्या सुचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घाबरु नये. हत्तींची आपल्या क्षेत्रात हलचल आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी. गावांमध्ये एकमेकांनी जनजागृती करुन मानव वन्यजीव संघर्ष होणार नाही व कमीत कमी नुकसान होईल याकरीता नागरीकांनी खालील सुचनांचे पालन करावे.

सायंकाळी सुर्यास्ता नंतर शेतात एकटयाने थांबू नये. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जागणी करीता जाऊ नये. हत्तींचा पाठलाग करु नये. हत्तीला बघण्यासाठी अथवा कुठल्याही कारणास्तव हत्तींच्या जवळ जाऊ नये. शेत पिकांचे नुकसान झाल्यास तात्काळ अर्ज करावे, वनविभागाकडुन नुकसान भरपाई देण्यात येईल. हत्तींच्या मार्गांमध्ये अडथळा केल्यास तो जास्त विध्वंसक होतो, त्यामध्ये नुकसान टाळण्याकरीता खबरदारी घ्यावी. असे आवाहन उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग कुलराज सिंह यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *