गोंदिया : यंदा जिल्ह्यात पावसान चांगलाच कहर केला. सततधार पावसान जिल्ह्यातील अनेकांची घरे जमीनउदवस्त झाली. तर अनेक शेतकर्यानां अतिव्रुष्टी फटका बसला. पोटाची खळगी भरणारा बळीराजा सध्या निसर्गाच्या कोपान बेजार झाला आहे. शेतीची मशागत, मजुरी आणि वाहतूक खर्च अशा सर्वच टप्प्यांवर महागाईने बळीराजाची कोंडी केली आहे. तर दुसरी कडे ऐन दिवाळी सारख्या सनाच्या तोडांवर निसर्गाच्या लहरीपणाचा फटक्यामुळे यंदा बळीराजाची दिवाळी अंधारातच आहे.
एकिकडे कोपलेला निसर्ग दुसरीकडे महागाई त्यात इंधन दरांमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ, खतांसह कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे कृषीमालास अपेक्षित हमीभाव मिळत नसल्याने उत्पादकांनी यंदा सपाटून मार खाल्ला आहे. खते व कीटकनाशकांच्या किमती गतवर्षींच्या तुलनेत दामदुपटीने वाढल्याने कृषिमालाचे उत्पादनमूल्यही वाढले आहे. मजुरीचे दरदेखील आवाक्यावर बाहेर जात असल्याने छोटा आणि मध्यमवर्गीय शेतकरी व संबंधित घटक या दुष्टचक्रामध्ये भरडला जात असून, शेतकऱ्यांसाठी सरकारकडे धोरणांचा अभाव असल्याचा आरोप शेतकरी संघटनांमधून होत आहे.
विशेषता निसर्गाच्या नाहरके पानाचा चांगलाच फटका शेतकर्यानां पडत आहे. सरकारने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची अपेक्षा कृषीवर्गातून व्यक्त केली जात आहे. नोकरदारांमध्ये मात्र महागाईशी जुळवून घेताना शासनाचे महागाई भत्ते, वेतन आयोगांच्या तरतूदी, खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेला पर्यायी रोजगार यासारखे असे पर्याय कृषीक्षेत्राकडे नसल्याने शेतकऱ्यांची सर्वच आघाड्यांवर कोंडी होत आहे. सरकारने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून महागाईवर नियंत्रण आणावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
इंधनाचे आवाक्याबाहेर गेलेले दर, हमीभावाचा अभाव, नैसर्गिक संकटे व चुकीची धोरणे याचा थेट फटका कृषी क्षेत्राला बसत आहे. सर्वबाजूने बळीराजा अडचणीत आला आहे. कृषीमालाचे उत्पादनमूल्यदेखील वसूल होत नाही. तर येन दिवाळीच्या पर्वावर निर्ग कोपल्यास शेतकरी चांगलाच संकटात सापडनार असुन कापणी वर आलेला भात पिक हातुन निसटन्याच्या तयारीत आहे.- अरविंन्द शेन्डें, शेतकरी
वस्तू गतवर्षीचा दर यंदाचा दर
- पीव्हीसी पाईप : २ इंची —-३०० रुपये ———–३९० रुपये
- पीव्हीसी पाईप अडीच इंची –४०० रुपये ———–८०० रुपये
- पीव्हीसी पाईप तीन इंची —६०० रुपये ———–११५० रुपये
- पीव्हीसी पाईप चार इंची —८७० रुपये ———–१६५० रुपये
- फर्टिलायझर ————१५०० रुपये प्रति गोणी ——-३००० रुपये प्रतिगोणी
- डीएपी खते ————१२०० रुपये —————१७०० रुपये
- कीटकनाशके ————-५०० रुपये ————–१००० रुपये
- स्टील : —————- ४० रुपये (प्रतिकिलो) ——६५ रुपये प्रतिकिलो